नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
लोकशिक्षणातील कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६५ व्या स्मृतीदिनानिमित्त जवळा देशमुख येथे शालेय परिसर स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन करण्यात आले. गत पाच वर्षांपासून हा उपक्रम जवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध माध्यमांतून राबविण्यात येत आहे. यावेळी कृतीशील अभिवादन उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक जी. एस. ढवळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसेवक संदिप अंबुलगेकर, एच. आर. हाथोडे, साहेब शिखरे यांची उपस्थिती होती.
शालेय स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जवळा दे. येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन शाळा परिसर, वर्गखोल्या, परसबाग, शालेय स्वच्छता संकुल, कार्यालय, किचनशेड, बालवाचनालय, डिजीटल कक्ष, शाळेसमोरील मुख्य रस्ता आदी ठिकाणी परिसर स्वच्छता केली. यावेळी गावकर्यांनी या लहान चिमुकल्यांचे कौतुक केले. ग्राम पंचायत कार्यालयातही राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे धुप व पुष्पपुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मारोती चक्रधर, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख, इंदिरा पांचाळ, सुलोचना गच्चे, कमलबाई गच्चे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची स्वयंस्फूर्त उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .