मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील कोविड १९ च्या नंतर ही परीक्षा पुर्वी प्रमाणेच आता सुरळीतपणे होणार आहे. विद्यार्थी नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ही परीक्षा काँपीमुक होण्यासाठी शिक्षण मंडळांने योग्य ती सुचना व खबरदारी घेण्याचे आवाहन शाळा प्रशासनाला व मुख्याध्यापकांना दिलेले आहेत. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर योग्य त्या सूचना दिल्या आहेत. भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचा परीक्षांवर पडणार नाही असे सुत्रांनी सांगितले.
.बारावीप्रमाणेच दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ६१ हजार विद्यार्थी कमी झाले आहेत.कोरोनाच्या काळात देण्यात आलेली वाढीव वेळ रद्द करण्यात आली आहे.
दहावी बारावी परीक्षा निकाल नेहमीप्रमाणेच जुन महिन्यात लागणार आहे. परीक्षक व नियामक यांची नियुक्तीपत्रे शाळा मुख्याध्यापकांना पाठवण्यात आली आहेत.
परीक्षेस बसणार्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व आत्मविश्वासाने पेपर द्या असे आवाहन हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी केले आहे. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या संपादक मंडळ व वाचकांकडून हार्दिक शुभेच्छा!
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .