महाराष्ट्र दिनी आयोजित राज्य गीत गायन उपक्रम आता १५ ऑगस्ट रोजी होणार..

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्ष निमित्त जिल्हा  प्रशासन यांच्या  निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्हयातील सर्व माध्यामाच्या  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यामिक  शाळामधील सर्व विद्यार्थी आपआपल्यां शाळेत कार्यालयात एकाच वेळी सकाळी ८.०० वाजता लोकप्रतिनिधीसह १ मे २०२३ रोजी गर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीताचे सामुदायिक गायन करणार होते परंतु सध्या राज्यामध्ये हवामानामध्ये बदल होवुन उष्ण्तेची तीव्र लाट पसरलेली आहे.या अनुषंगाने शासनाने २१.०४.२०२३ पासुन शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहिर केली आहे. 

उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणुन सुरक्षेच्या दृष्टीने सद्यस्थितीत शाळेत विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत. म्ह्णुन प्रशासनाने १ मे रोजी होणारा सामुदायिक राज्यगीत गायन हा उपक्रम तुर्तास स्थगित केला आहे. 

सदरील उपक्रम हा १५ ऑगस्ट२०२३ ला स्वातंत्र्य दिनी राबविण्या चे धोरण ठरले आहे. कार्यक्रमाचे नियोजन सर्वांना कळविण्यात येईल. 

१ मे २०२३ रोजीच्या राज्यगीत उपक्रम तुर्तास स्थगीत केल्याची नोंद सर्व संबंधीत प्राचार्य,मुख्यााध्याक, शिक्षक इत्यादी संबंधीत यंत्रणेने घ्यावी. असे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा) ,शिक्षणाधिकारी (मा) यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)