नांदेड ( शालेय वृतसेवा ) :
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्हाभरातील शाळांमधून इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेश पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात येत आहे. यासाठी जवळा देशमुख येथील शिक्षकांनी वेगळीच शक्कल लढवत अॅटोरॅली काढून शालेय प्रवेश पूर्वतयारी मेळावा आयोजित केला.
यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आनंद गोडबोले, गुणवंत गच्चे, अंगणवाडी सेविका इंदिरा पांचाळ, सुलोचना गच्चे, संभाजी गवारे, राजेश गच्चे, सुरेश गोडबोले, हैदर शेख आदींची उपस्थिती होती.
शाळाप्रवेश पूर्व तयारी मेळाव्यासाठी विविध ठिकाणी स्टाॅल ठेवण्यात आले होते. या प्रत्येक ठिकाणी पालकांनी प्रतिसाद दिला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळा देशमुख येथे गावभर अॅटोरॅली काढून लाऊड स्पीकरवरुन शाळाप्रवेश पूर्व तयारी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करीत वयानुसार पात्र नवागत चिमुकल्यांना शाळेत आणले. सर्वांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
शाळाप्रवेश पूर्व तयारी मेळाव्यात ओम ननुरे, ईश्वर शिखरे, विश्वास गोडबोले, विठ्ठल गोडबोले, प्रियल गच्चे, सिद्धी शिखरे, स्वरा शिखरे, संकेत शिखरे, शाकेर शेख, शैलेश मठपती या एकूण अकरा विद्यार्थ्यांनी यावेळी नोंदणी कक्षात येऊन प्रवेश नोंदणी केली. यावेळी आपल्या मुलांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांनी सहकार्य केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .