शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेडचे उज्ज्वल यश: पंचवीस विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले

शालेयवृत्त सेवा
0

 


मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे आणि शिक्षणाधकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले अभिनंदन !


नांदेड ( शालेय वृतसेवा ) :

     शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील येवू घातलेल्या अनेक स्पर्धा परीक्षेंचा पाया असतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडूच या लहान वयापासूनच मिळत असते. नेमक्या याच बाबींचा पाया पक्का व्हावा,या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत दरवर्षी राज्यात पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी व माध्यमिक इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. 

       नांदेड जिल्ह्यात 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या या परीक्षेस विद्यार्थ्यांनी प्रचंड व भरघोस प्रतिसाद नोंदवित 96 टक्के उपस्थिती दिली आहे. पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वीसाठी जिल्ह्यातून 16 तालुक्याच्यावतिने  24038 विद्यार्थी परीक्षेस बसले होते,त्यापैकी 23234 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.  ही एकूण टक्केवारी 96.57 टक्के नोंदविण्यात आली. माध्यमिक इयत्ता 8 वीसाठी 17877 विद्यार्थी परीक्षेस बसले होते,त्यापैकी 17273 विद्यार्थी उपस्थिती होते.

 ही एकूण टक्केवारी 96 टक्के नोंदविण्यात आली. यापैकी इयत्ता 5 वीसाठी 3521 विद्यार्थी पात्र झाले होते.त्यात 485 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता 8 वीसाठी 1858 विद्यार्थी पात्र असून 466 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. याशिवाय नांदेडचे राज्य गुणवत्ता यादीमध्ये एकूण 25 विद्यार्थी निवड झाली आहे. 

       जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शनातून शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व विविध बैठकीतून व्यक्त केल्यामुळे सौ.सविता बिरगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक सोळा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना प्रोत्साहित करुन शिष्यवृत्ती परीक्षेची आवश्यकता पटवून दिल्यामुळे जिल्ह्यात शिष्यवृत्तीमय वातावरणात निर्मिती झाली आणि यातूनच  राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी संख्या वाढ होण्यास मदत झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)