शाळेचा शंभर टक्के निकाल...
कु. साक्षी कृष्णा सुकाशे जिल्हा गुणवत्ता यादीत !
औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी फेब्रु. 2023 मध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतीम निकाल जाहीर झाला असून निकालात गंगापूर तालुक्यातिल जि. प. उ. प्रा. शा. संजरपूर शाळेचा 100% निकाल लागला असून शाळेची विद्यार्थीनी कु. साक्षी कृष्णा सुकाशे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकली आहे. तसेच याच शाळेचे कु.श्रावणी भाऊसाहेब साबळे, आल्फीया अलिम शेख, कु. शितल रामेश्वर मेटे, चि. गौरव नवनाथ सुकाशे ,चि.ओमकार बळीराम जगताप, हे विदयार्थी सुद्धा उत्तीर्ण झाले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाने जि. प. उ. प्रा. शा संजरपूर चर्चेत आली आहे.
विद्यार्थ्यांना श्री. रमेश ठाणगेसर यांचे विशेष मार्गदर्शन तसेच शाळेतील श्री. रावसाहेब शिंदेसर, श्री. मुरलीधर लगड सर, श्री. शैलेश लाड सर, श्री. आमनखा पठाण सर, श्रीम. रुपाली लामखडे मॅडम ,श्रीम. सुरेखा साठे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर निकालाचे केंद्रप्रमुख श्री. विजय तुपे सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री अरविंद कापसे साहेब,श्री. अनिलकुमार सुकदेव साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री समाधान आराख साहेब तसेच शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ, संजरपूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णाभाऊ सुकाशे यांचे कडून कौतुक होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .