जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेला ग्रामस्थांनी दिली कार भेट !

शालेयवृत्त सेवा
0

 


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) : 

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन, शिक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीची वर्गशिक्षिका श्रीमती धुमाळ मॅडमना ग्रामस्थांनी 'कार ' भेट देऊन सन्मान केला आहे.




आजकाल शिक्षकाची प्रतिमा काही चांगली पाहायला मिळत नाही पण काही शिक्षक पूर्णपणे स्वतःला वाहून घेतात हे ही नाकारता येत नाही. शिक्षक - शिक्षिका यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा डिजिटल होताना दिसत आहे. कुठे हिरवी शाळा तर कुठे निसर्ग शाळा कुठे नवोदय परीक्षा मध्ये अनेक विद्यार्थी पात्र होतात तर कुठे शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा अनेक विद्यार्थी पात्र होताना दिसतात याचे पूर्ण श्रेय त्या त्या शाळेतील त्या त्या वर्गशिक्षकांना जाते यात मुळीच शंका नाही. 


पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील अशीच एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर गावात असून या गावात तब्बल 65 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला पात्र ठरले यामुळे गावातील सर्व गावकऱ्यांनी त्या वर्गशिक्षिकेचा आपण काहीतरी भेट म्हणून द्यावं याची चर्चा झाली अन एक अनोखी भेट 'कार ' अकस्मित मिळाल्यामुळे वर्गशिक्षिका सुद्धा आश्चर्यचकित  झाली. शिक्षिकेच्या मनात आपण फक्त कर्तव्य केलं ,विद्यार्थ्यांना शिकविलं, विद्यार्थी शिकले आणि उत्तीर्ण झाले अशीच भावना होती.पण गावकऱ्यांच्या मनात शिक्षक शिक्षिके बाबत किती मोठा आदर असेल या उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)