सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शालेयवृत्त सेवा
0

 


 

स्वातंत्र्य दिनानिमित्त लोणी शाळेचा उपक्रम


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातिल केंद्र कमठाला येथील लोणी जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा ' कोण बनेगा विजेता ? ' कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्सुर्फुत सहभाग नोंदविल्याने विषेश ठरला. 


गावालील प्रमुख मार्गाने सकाळी प्रभात फेरी ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाल्यानंतर पंचप्रण शपथ, तंबाखूमुक्तीची शपथ, निपुन भारत प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांची मराठी हिन्दी इंग्रजी भाषेतून भाषणे झाली. शालेय पोषण आहार अंतर्गत राजगीरा लाडूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्काऊट गाईड शिक्षक राहुल तामगाडगे यांनी केले.



स्वातंत्र्य दिन विशेष उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा ' कोण बनेगा विजेता ? ' यात निवड पद्धतीने इयता पाचवी सहावी सातवी मधून प्रत्येकी तीन विद्यार्थांची निवड करण्यात आली. मारोती मेंडलकर , ऋतिक गुंजकर, आराध्या गेडाम, मंत्रा गुंजकर, पायल वाघमारे, श्रेया गुंजकर, पूर्वी धुर्वे , ज्योती कोसरे, प्रतिक गुंजकर या विद्यार्थ्यांने हसत - खेळत उतरे देण्याचा प्रयत्न करित होते. विजेत्यांना आणि सहभागिना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी केले तर आभार पदविधर शिक्षक अंकुश राऊत यांनी केले.


कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरंपच बेबीबाई कुरसंगे, उपसरपंच सिमाताई पावडे, तंटामुक्त समितीचे गोपीनाथ पाटील, शालेय व्यवस्था 1पन समितीचे हणमंत गुजकर, विजय पावडे, भिमराव कुरसंगे, संजय मोहिते, अमर सुरोशे, निळकंठ गुंजकर, अनिल दर्शनवाड, अनंता बादड, रघूनाथ काळे, सुशिल गुंजकर, एकनाथ बादड, अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, नंदा सावरकर आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)