गुरुजी आता लिहीते व्हा.. बालभारतीकडून 'शिक्षणगाथा ' त्रैमासिक होणार सुरु

शालेयवृत्त सेवा
0

 



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

बालभारतीकडून राज्यभरातील शिक्षकांसाठी शिक्षणगाथा हे त्रैमासिक सुरू करण्यात आलेले आहे. हे त्रैमासिक केवळ शिक्षकांनी राबवलेले नाविन्यपूर्ण असे उपक्रम प्रकाशित करते. आता तुम्ही देखील आपल्या शाळेतील उपक्रम शिक्षणगाथासाठी पाठवू शकता..



पुढील काही मुद्दे उपक्रमाच्या लेखामध्ये असावेत.


उपक्रमाची सुरुवात कशी झाली त्याचा उद्देश

त्याची अंमलबजावणी कशी केली.


विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होतोय.


उपक्रम राबवताना काय काय अडथळे आले.. त्यावर मात कशी केली.


इतर तुम्हाला महत्वाचे वाटणारे मुद्दे.



उपक्रम सविस्तरपणे लिहून त्याची वर्ड फाईल पाठवावी. त्यासह उपक्रमादरम्यानचे ४ ते ५ एचडी फोटोज पाठवावेत. 


सर्व माहिती पुढील इमेलवर पाठवावी

shikshangatha@ebalbharati.in

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)