सरोवर शिक्षण मंडळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

शालेयवृत्त सेवा
0

 



सरोवर शिक्षण मंडळ येथे  शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

  

सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील सरोवर शिक्षण मंडळाच्या अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल, जीवन विकास माध्यमिक शाळा, सरामद जैनब उर्दू स्कूल, डॉ .अब्दुल कलाम जुनिअर कॉलेज व सर्व माध्यमाच्या बालवाडी या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2025- 26 च्या शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेणाऱ्या नवागतांचे स्वागत यावेळी उत्साहात करण्यात आले. ढोल ताशांच्या निनादात प्रभात फेरी काढण्यात आली. पहिले पाऊल, नवागतांचे स्वागत, विविध स्पर्धा, बी.टी.एस. परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड वाटप करण्यात आले.


         अध्यक्ष फारुक आकिवाटे, सचिव  हरुण रशीद मुल्ला, पदाधिकारी मोहम्मद सरवर मुल्ला ,खजिनदार ताहेर मुल्ला , सर्व मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते नवागतांचे गुलाब पुष्प व खाऊ व मोफत पाठ्यपुस्तक वाटप देऊन स्वागत करण्यात आले. सरोवर शिक्षण मंडळाच्या शाळां आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ,शालेय गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम , उपक्रमशील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  समाज विकासाचे उत्तम कार्य करत आहेत असे गौरव उद्गार  प्रवेश घेणाऱ्या नवागतांच्या पालकांनी काढले.


          प्रारंभी  स्वागत सौ.विद्या चौगुले यांनी तर संस्थेचे अध्यक्ष फारुख अकिवाटे यांनी प्रस्तावना केली. तर सरोवर मंडळाचे सदस्य सरवर मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शबाना नदाफ, आसमा नदाफ, अश्विनी पाटील यांनी केले .     या कार्यक्रमास मुख्याध्यापिका नसीमाबानू पिरजादे मॅडम , शाईन नदाफ मॅडम व संजय कुरणे सर तसेच तनवीर मुल्ला सर व पदाधिकारी , विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)