अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचा उपक्रम !
नांदेड ( प्रतिनिधी ) :
भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून संविधानाच्या निर्मितीला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. २६ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानिक मूल्ये रूजविण्यासाठी विविध स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. याच संकल्पनेचा धागा धरून अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ , महाराष्ट्र ( रजि. ) च्या पुढाकाराने "कविता संविधानाच्या.." हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. या विषयावर ७५ कवींच्या ७५ कवितांचे संकलन राज्यभरातून होत असून नवोदीत कवी शिक्षक , प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून कविता मागविण्यात येत आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातसुद्धा "शब्दगंध" नावाचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला होता. राज्याच्या तत्कालिन शिक्षणमंत्री महोदयांनी त्याला शुभेच्छा ब्लर्ब दिला होता. बालभारती किशोर मासिकाचे संपादक मा.किरण केंद्रे सरांनी प्रस्तावना लिहिली होती तर जिल्हा परिषद नांदेडच्या सीईओं महोदया यांच्या हस्ते तो काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. राज्यातील अनेक साहित्यिकांच्या उत्तमोत्तम प्रतिक्रिया त्याला मिळाल्या होत्या. त्याच धर्तीवर "कविता संविधानाच्या.. हा काव्यसंग्रह भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये प्रकाशित होणाऱ्या काव्य संग्रहासाठी आपली स्वलिखित संविधान विषयक एक दर्जेदार कविता रमेश मुनेश्वर ( 75884 24735 ) व मिलिंद जाधव ( 94239 02454 ) यांच्या सदरील वॉट्सअप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .