नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न 14 सप्टेंबर पर्यंत सोडवा अन्यथा 15 सप्टेंबर रोजी शिक्षक परिषदेच्या वतीने ढोल बाजे आंदोलन करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने गेली तीन महिन्यापासून अनेक वेळा निवेदन देऊनही जिल्हा प्रशासनाने एकही प्रश्न सोडवला नाही. यामुळे आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे यांची शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शिक्षकांच्या खालील प्रलंबित प्रश्न जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी मांडले.
प्रमुख मागण्या :
1) 5 सप्टेंबर हा "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दिला जाणारा "जिल्हा शिक्षक पुरस्कार" व "तालुका शिक्षक पुरस्कार" पाच सप्टेंबर रोजी देऊन सन्मानित करावा.
2) जिल्हा परिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणात रिक्त असलेले शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,पदोन्नत मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक ,विषय शिक्षक पदे शासन निर्णयानुसार पदोन्नतीने समुपदेशनाने भरावे.
3) जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या परंतु अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पदोन्नती नंतर समायोजन करण्यात यावे.
4) इयत्ता सहावी ते आठवी अध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांना 2019 पासून प्रलंबित असलेली वेतनश्रेणी लागू करावे.
5)सलग 12 वर्ष व 24 वर्ष एकाच पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना चटोपाध्याय व वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी.
6) जिल्हा परिषदेत कार्य सर्व शिक्षक व सेवानिवृत्त पेन्शन धारकांचे वेतन दरमहा विलंबाने जमा होत आहे. यामुळे बँक व पतसंस्थेचे भुर्दंड शिक्षकावर पडत आहे.तरी शासनाकडून वेतन अनुदान प्राप्त होताच वेतन वेळेत अदा करावे.
7)भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रातील त्रुटी दुरुस्ती करून विवरणपत्र ऑनलाईन दुरुस्ती करून विवरणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी.
8) डी.सीपी.एस धारकांच्या कपातीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी.
9) सेवानिवृत्त पेन्शन धारकांचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढून त्यांना मिळणारे सर्व लाभ त्यांच्या खात्यावर जमा करावे.
10) जिल्हा परिषदतील सर्व शिक्षकांचे वैद्यकीय देयके अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ती विनाविलंब अदा करावे.
11)महाराष्ट्र शासनाच्या "निपुण महाराष्ट्र अभियान" सोडता इतर कोणतेही गुणवत्ता तपासणी तथा चाचणी राज्य शासनाच्या परवानगीशिवाय जिल्ह्यात राबवू नये.
12) जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षक बांधवांची त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती करण्यात यावी.
13)जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्याची प्रचंड नुकसान झालेल्या शाळेस अनुदान उपलब्ध करून देण्यात यावा.
14)शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करून गुणवत्ता वाढीसाठी वेळ उपलब्ध करून द्यावा.
15)जिल्ह्यांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करून बदली ठिकाणी उपस्थित होण्याचे आदेश द्यावे.
16) जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील संवर्ग 1 मधील शिक्षकांची शासन निर्णयानुसार शारीरिक तपासणी करण्यात यावी.
या प्रलंबित मागण्या 15 सप्टेंबर पर्यंत सोडवल्या नाहीत, तर जिल्हा परिषदेच्या समोर दुपारी बारा वाजता प्रलंबित प्रश्नाच्या न्याय हक्क मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपस्थित शिष्टमंडळाने निवेदन दिला.
या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड ,दिव्यांग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंता बैस, माध्यमिक शिक्षक संघटनेचे श्री एम.ए. खदीर,जिल्हा कार्यालयीन मंत्री बळवंत मंगनाळे, जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार, जिल्हाप्रवक्ते रवि ढगे,जिल्हा संघटनमंत्री संजय मोरे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश ईटलोड, जिल्हा संघटक हणमंत काऊलवार, बिलोली तालुका अध्यक्ष संजय गंजगुडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर आदिजण उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .