यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नांदेडचे डॉ.शेख मोहम्मद वखिओदिन यांना आणि लातूरचे प्रा.डॉ. संदिपान जगदाळे यांना जाहिर..

शालेयवृत्त सेवा
0

 



राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - २०२५ - राष्ट्रपती पुरस्कार जाहीर


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नांदेडच्या डॉ.शेख मोहम्मद वखिओदिन यांना आणि लातूरचे  प्रा.डॉ. संदिपान जगदाळे यांना जाहिर झाला असून येत्या शिक्षक दिनी महाराष्ट्रातील या दोन शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे.


डॉ. शेख मोहम्मद वखिओदिन जि.प.हा.अर्धापुर जि. नांदेड यांना महाराष्ट्र राज्यातून प्राप्त झाला आहे, भारत देशातील शिक्षक संवर्गातून केवळ ५० शिक्षकांना हा अत्यंत मानाचा पुरस्कार देशाच्या महामाहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते ०५-सप्टेंबर २०२५ रोजी दिला जाणार आहे. डॉ. शेख सरांना २०१३-१४ मध्ये नांदेड जिल्हा शिक्षक पुरस्कार, २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, डॉ. शेख सर, २०१४ पासून बालभारती येथे पाठ्यपुस्तक मंडळावर "विज्ञान, जलसुरक्षा, शिक्षणशास्त्र" ह्या विषयाकरिता अभ्यासगट सदस्य पदी इयत्ता सहावी-बारावी साठी कार्यरत होते, अनेक सामाजीक व शैक्षणिक उपक्रम सरांनी यशस्वीरित्या पुर्णत्वास नेले आहेत. सर नांदेड जिल्हा शिक्षण मंडाळाचे विदयमान संचालक आहेत, तथापी "टाईड्स" शिक्षक संघटना, महा.रा. अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी संघटनेचे संस्थापक आहेत, सरांचा माध्यमिक शिक्षक म्हणून २८ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव आहे.

दयानंद कॉलेज लातूरचे उपक्रमशील कला विषयाचे प्राध्यापक डॉ. संदिपान जगदाळे सर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


दहा वर्षानंतर मराठवाड्यातून राष्ट्रपती पुरस्कार पहिल्यांदाच "नांदेड" च्या डॉ. शेख सरांना प्रदान... समस्त मराठवाड्यासाठी तथा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मानाची व अभिमानाची बाब..!



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)