हर घर तिरंगा उपक्रमात विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभागाबद्दल सीसीआरटी स्वयंसेवक गोपाल गावीत यांचा सत्कार

शालेयवृत्त सेवा
0






हरणमाळ येथील प्राथमिक शिक्षक श्री. गोपाल होनजी गावित यांचा झाला सन्मान !


नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ येथील प्राथमिक शिक्षक श्री. गोपाल होनजी गावित यांना सन्मानाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

दि. २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या राष्ट्रीय उपक्रमात स्वयंसेवक म्हणून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोहिमेला जनसहभाग लाभला तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल जनजागृती व देशभक्तीची भावना दृढ झाली.


सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांच्या कार्याचे कौतुक करताना अभिमानाने प्रमाणपत्र बहाल केले असून स्थानिक पातळीवरही गावित यांच्या या कामगिरीचे स्वागत व गौरव होत आहे. जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदीत “हर घर तिरंगा” या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. नवापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश देसले यांनी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सी.सी.आर.टी. स्वयंसेवक श्री. गोपाल गावित यांना मिळालेल्या सांस्कृतिक मंत्रालय मार्फत सर्टिफिकेटबद्दल अभिनंदन केले. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश देसले यांनी गोपाल गावीत यांच्या कार्याची दखल घेतली व देशभक्तीपर उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. गावपातळीवर विद्यार्थ्यांना व नागरिकांना राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावित यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले.


या अभिनंदनामुळे शिक्षण विभागातील शिक्षक व स्वयंसेवक यांना अशा सामाजिक व राष्ट्रप्रेम वाढविणाऱ्या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ, शासकीय आश्रम शाळा ढोंग सागाळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोराबारी तसेच प्रियदर्शनी शैक्षणिक विकास ट्रस्ट संचलित लोकनेते स्व. बटेसिंग भैय्या रघुवंशी माध्यमिक विद्यालय, ढेकवद (ता. नंदुरबार) येथे विद्यार्थ्यांची शंभर टक्के ऑनलाइन नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.


या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हंसराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विनोदगीर बुवा, देवेंद्र उत्तम अहिरे, श्रीमती मोतनबाई चव्हाण, प्रभाकर रघुनाथ पाटील, श्रीमती वैशाली चौरे,  वसंत पवार, पाचोराबारी शाळेचे मुख्याध्यापक ओमशेखर काळा, हरणमाळ जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका छोटी पाटील, शासकीय आश्रम शाळा खडकी  येथील मुख्याध्यापक पाऊल गावीत आदी शिक्षक यांनी सहकार्य केले आहेत. तसेच सीसीआरटी स्वयंसेवक श्री. गोपाल होनजी गावीत यांनी विद्यार्थ्यांचे छायाचित्रे संकलित करून नोंदणीची प्रक्रिया पार पाडली.


याप्रसंगी सीसीआरटी स्वयंसेवक गोपाल गावीत यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, एकात्मता व स्वातंत्र्याचा अभिमान वृद्धिंगत झाला असून त्यांच्या मनामनात देशभक्तीची भावना दृढ झाली आहे.”सीसीआरटी शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासकांमध्ये भारताच्या विविध प्रादेशिक संस्कृतींबद्दल जागरूकता वाढवून शिक्षण प्रणालीला पुनरुज्जीवित करते. हे विशेष गरजू मुलांसाठी देशभरात विविध प्रशिक्षण कार्यक्रम देते, ज्याचा उद्देश सांस्कृतिक समज प्रभावीपणे शिक्षणात समाविष्ट करणे आहे.


या यशस्वी उपक्रमासाठी शिक्षक गोपाल गावीत स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक जिल्हा परिषद नंदुरबार माजी अध्यक्ष श्री. भरतभाऊ गावित, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रमेश चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. जयश्री बागले, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. निंबा पाकळे, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक श्री. संजय गावीत यांनी शुभेच्छांबद्दल कौतुक केले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)