जी व्यक्ती निसर्गसाठी स्वतःचे पूर्ण आयुष्य वाहून घेते.त्याला निसर्ग सुद्धा सेवा करण्यासाठी भरपूर आयुष्य देतो. !
पद्मश्री डॉ.सालूमरदा थीमक्का जन्म 30 जून 1911 कर्नाटक राज्यातील तुमकुरु जिल्ह्यात गुड्डी येथे निसर्गासाठी झाला असेच म्हणावे लागेल.याच वृक्षसंपदेतील निसर्गाचा निरोप 14 नोव्हेंबर 2025 रोजी निघून गेल्या. त्यांनी निर्माण केलेली वनसंपदा वृक्षवल्ली हिरवीगार होऊन बारा महिने शुद्ध ऑक्सिजन देत आहे. हे कार्य पिढ्यानपिढ्या लावलेली झाडे करणार आहेत.त्यांना तब्बल 114 वर्ष दीर्घआयुष्य लाभले. हे मिळणं हेच खरं निसर्गाचं ईश्वररुपी वरदान म्हणावे लागेल. बालपणापासून त्या खाणीमध्ये अतिशय कष्टमय बिगारी काम करत असत.खाणीमध्ये धुळीचे प्रमाण फार मोठे असते. करणाऱ्या लोकांना शुद्ध ऑक्सिजन फारच दुर्मिळ असतो.कामगारांचे आजारपण ही गंभीर बाब आहे.शिक्षणाशी कसलाही गंध नसलेल्या गरीब घरात त्यांचा जन्म झाला होता.त्यांचा घरातील लोकांनी तेथीलच मजुराशी विवाह करण्यात आला. मूलबाळ होत नव्हते. हे फार मोठे दुःख होते. रामनगर जिल्ह्यातील हुलीकल आणि कुडूर दरम्यान रस्त्याच्या कडेला व पट्ट्यात 385 वडाची झाडे 4.5 किमी पर्यंत लावल्यामुळे त्यांना सालूमरदा( झाडांची रांग) हे नाव मिळाले. त्यांना मूल- बाळ होत नसल्यामुळे हीच झाडे मुले म्हणून सांभाळ केला. आणि आपल्या जीवनातील पोकळी व दुःख भरून काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला वडाच्या झाडांची लागवड करून निसर्ग निर्माण केला. याच वेळी लोक त्यांना वेड्यात काढत असे,नावे ठेवत असत त्याची तमन्ना न बाळगता त्यांनी वृक्ष संगोपन व कार्य अखंडपणे चालू ठेवले.मिळणारा आनंद जीवनामध्ये सार्थ करून ठेवत गेल्या. त्यासाठी आपले सारे जीवन झाडांसाठी वाहून घेतले.
आठ हजार वृक्ष लावून त्यांनी आपली राष्ट्रीय कार्य जनजागृतीतून जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. वृक्षांची जोपासना आपल्या लहान मुलांसारखी केली. कसलेही शिक्षण न घेतलेल्या पद्मश्री डॉ. थीमका एक प्रभावशाली पर्यावरणवादी जागतिक स्तरावर होऊन गेल्या. त्यांच्या नावाने परदेशात पार्क आहेत. एन्व्हायरमेंट संशोधन केंद्र आहेत. त्यांची नावे दिली गेली आहेत. जगातील शंभर प्रभावीशाली स्त्रियांमध्ये त्यांचे नाव नोंद होऊन गेले. बीबीसी संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक मुलाखती घेतल्या गेल्या.
कॉर्पनिया,लॉस एंजल्स, ऑकलँड येथे थीमका संशोधन केंद्र पर्यावरण संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. अमेरिकेत सुद्धा त्यांच्या नावाची एन्व्हायरमेंट सुसज्ज संस्था कार्य करीत आहे. कर्नाटक सरकारने या कार्याची दखल घेऊन कर्नाटक विद्यापीठाने मानद डॉ.पदवी सन्मानपूर्वक दिली. परंतु आपल्या मायबाप सरकारने केलेल्या कार्याची गुणगौरव करण्यास खूप वेळ लावला. त्यांना 108 वर्षे पद्मश्री 2019 मध्ये मिळण्यास वेळ लागला.
आजवर त्यांना आपल्या देशाने व आंतरराष्ट्रीय स्तरावर बारा मोठे पुरस्कार प्राप्त झाले आहे. शिक्षणाचा कसलाही गंध नसलेल्या आपल्या भारतीय पद्मश्री सालूमरदा थीमक्का एवढ्या मोठ्या कार्याची जगाने दखल घेतली. त्यांच्या नावाने पर्यावरणात आधुनिक मॉडेल तयार केले.हम्पी विद्यापीठाने नवजा पुरस्कार,राष्ट्रीय नागरिक पुरस्कार,इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या पर्यावरण कार्याची परदेशीय राष्ट्रांनी लवकर दखल घेतली गेली. परंतु आपल्या शासकीय अनास्तेमुळे घेतली गेली नाही. त्यांना दीर्घ 114 वर्षाचे आयुष्य लाभले. आठ हजार देशी झाडांची हिरवीगार वनराई निर्माण केली. अनेक पशु-पक्षांना हक्काचा निवारा मिळाला. नवीन निर्माण होणाऱ्या पशु पक्षांच्या त्या माता बनल्या.
या वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचे संरक्षण महान कार्य त्यांच्या हातून घडून आले. या कार्यामध्ये अनेक पिढ्यानपिढ्या स्वच्छ हवा देणारे वृक्ष सदाबहार हिरवेगार होऊन गेले. जगामध्ये ऑक्सिजन निर्माण करण्याचा कुठेही कारखाना नाही हे कार्य फक्त झाड करत असते. आज जागतिक हवामानामध्ये पूर्ण जग होरपळून जात आहे. त्याचे सारे जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहे. डॉ.पद्मश्री सालूमरदा थिंमक्का वैयक्तिक आयुष्यातील दुःख विसरावे म्हणून वृक्ष लागवड केली. आणि सर्व दुःख विसरून निसर्गाशी एकरूप झाल्या. पूर्ण जगाच्या आयडियल आयकॉनिक होऊन सुपर वुमेन बनवून गेल्या.
गरिबीतून एक मोठं जागतिक पातळीवरील कार्य करून गेल्या. आणि त्यांचे शालेय महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात धडे आहेत. जगात अनेक परदेशीय भाषेत पुस्तके आहेत. माझ्या सारख्या वृक्षप्रेमी, लेखक म्हणून वृक्ष मातेची आदरपूर्वक भावपूर्व श्रद्धांजली या लेखरूपी..
जय पर्यावरण**** जय वृक्षसंपदा
- तानाजी फणसे.
पर्यावरण संरक्षक.लेखक
नवी मुंबईकर.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .