वाशिम ( शालेय वृत्तसेवा ) :
नुकताच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद शाळा साखरा प.स.वाशिम जिल्हा वाशिम या शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील यशाची परंपरा कायम राखत तब्बल 21 विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी पात्र! जिल्हा परिषद शाळेच्या मुकुटात यशाचा तुरा रोवणारा निकाल साखरा शाळेचा लागला आहे.
कर्मयोगी आदरणीय श्री. विनोद झनक सर यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन, कोणतीही सुट्टी न घेता, सेवाभावी भावनेने विद्यार्थ्यांना जीव तोडून मार्गदर्शन केले आहे...त्यांच्या या निस्वार्थ कार्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या शाळेचे जिल्ह्यात सर्वात जास्त विद्यार्थी पात्र झाले आहेत.
यावर्षी आदरणीय सरांच्या अथक प्रयत्नांमुळे एकूण २१ विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून शाळेचा मान उंचावली आहे...!!! आज जिल्हा परिषद शाळेसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे..!!
या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ..
मार्गदर्शक कर्मयोगी आदरणीय श्री.झनक सर,सर्व यशवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक, शाळेचे मा.मुख्याध्यापक आणि आदरणीय सर्व शिक्षकवृंद, मा.शाळा व्यवस्थापन समिती, मा.ग्रामपंचायत, गावकरी,तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पुनश्च अभिनंदन. !
यशस्वी विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
१. मंजुश्री काळे
२. रिद्धी चव्हाण
३. हर्षदा कोरडे
४. पयोशनी ठाकरे
५. वैभवी ढोबळे
६. अनुष्का झनक
७. कृतिका कांबळे
८. जय राऊत
९. यश ढोबळे
१०. साईनाथ ढोबळे
११. कृष्णा ठाकरे
१२. अमित कांबळे
१३. सीमंत चौधरी
१४. देवांश ठाकरे
१५. हर्ष घोडके
१६. स्वरूप व्यास
१७. जगदीश खंदारे
१८. इंद्रजीत पंडित
१९. प्रियांशू भगत
२०. वेदांत बुरे
२१. आदित्य जाधव
आपल्या शाळेचा हा यशाचा प्रवास असाच पुढेही सुरू राहो,हीच सदिच्छा.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .