नांदेड / किनवट ( शालेय वृत्तसेवा ) :
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 मध्ये घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण व पारदर्शक परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखणी येथील तीन विद्यार्थी प्रवेश पात्र होऊन शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. तसेच 28 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी हे 90 च्या वर ,8 विद्यार्थी 80 च्या वर,9 विद्यार्थी 70 च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.
जिल्हा परिषद प्रा.शा.सारखणी शाळेत पात्र विद्यार्थी कु. स्वरा मेश्राम, कार्तिक चव्हाण ,केरबा खांडेकर यांचे आणि या यशाचे मानकरी , स्वतःला विद्यार्थी हिताकरिता झोकुन देणारे, सुट्टीच्या दिवशी ही पूर्ण वेळ शाळा करणारे शिक्षक श्री नरेंद्र कळंभे सर यांचे शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री सुनील भास्करवार सर ,श्री प्रमोद कांबळे सर ( केंद्रप्रमुख खंबाळा ),श्री प्रविण पिल्लेवार सर ,श्री विनायक कुडमते सर ,श्री पुनाराम जाधव सर ,श्री भाऊराव उमरे सर, श्री शरद वानखेडे सर ,श्रीमती लता ठक्कुरवार मॅडम व श्रीमती विशाखा किन्नरवाड मॅडम , श्री आकाश गुज्जलवाड तसेच गावातील पालक श्री शंकर चव्हाण,सौ.अनुपमा मेश्राम,श्री संजय राठोड, श्री मौफिक शेख, श्री मिसेवार ,श्री अमोल चव्हाण,यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले ,पुष्पगुच्छ व इंग्रजी डिक्शनरी देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .