नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
गोविंदेश्वर प्राथमिक शाळा, नांदेड येथील विद्यार्थी आकाश लक्ष्मण पुय्यड याची प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे शाळा, पालक आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आकाशने आपल्या मेहनती, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोविंदेश्वर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सचिन दिग्रसकर शिक्षकवृंद सूर्यकांत जाधव दिगम्बर कल्याणकर सुग्रीव मोरे संध्या सिंदगीकर शोभा किडे संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यावेळी शाळेच्या वतीने आकाशच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव वाढला आहे. निवृत्त मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आकाश लक्ष्मण पुय्यड याचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .