विज्ञान क्षेत्रासाठी जालना जिल्ह्याचा गौरव!
जालना ( शालेय वृत्तसेवा ) :
राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषद (NCSC) अंतर्गत जालना जिल्हा समन्वयक (District Coordinator) म्हणून श्री योगेश भरतराव अंभुरे यांची निवड झाल्याने विज्ञान शिक्षण क्षेत्रात जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे, संशोधन वृत्ती विकसित करणे आणि राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षकांना होणार आहे.
या उल्लेखनीय निवडीबद्दल श्री स. भु. प्रशाला, जालनाचे मुख्याध्यापक श्री मधुकर बिरहारे, स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. ज्योती धर्माधिकारी, उपमुख्याध्यापक श्री युवराज पाडळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी श्री अंभुरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्री अंभुरे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात राष्ट्रीय बाल विज्ञान (NCSC) चळवळीला अधिक बळ मिळेल आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रम व संशोधनाची प्रेरणा अधिक जोमाने रुजेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .