विज्ञान मेळाव्यात रोहित देशटवाड जिल्ह्यात प्रथम!

शालेयवृत्त सेवा
0

 


विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड; डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी केले अभिनंदन !


जालना (शालेय वृत्तसेवा ) : 

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात श्री सरस्वती भुवन प्रशाला, जालना येथील विद्यार्थी रोहित मारुती देशाटवाड याने प्रथम क्रमांक मिळविला. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ – भवितव्य (संधी) आणि आव्हाने’ या विषयावर त्याने प्रभावी सादरीकरण केले.


रोहितची दि. १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे. त्याच्या यशाबद्दल शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी विशेष कौतुक करून विभागीय स्तरावरील यशासाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. अंभुरे वाय. बी. यांचेही अभिनंदन करण्यात आले. रोहितचे मुख्याध्यापक श्री मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक श्री युवराज पाडळे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)