द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे, ( शालेय वृत्तसेवा ) :
महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता स्त्री शिक्षण शेतकरी कल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रात केलेले कार्य अद्वितीय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याविषयी नियमित पुस्तक वाचनाचा संकल्प करावा. त्यासाठी शाळांना पुस्तके पुरवून वाचनालये ही ज्ञान केंद्रे म्हणून स्थापन करावीत. त्यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करावे, स्त्री शिक्षणाचे महत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले यांचे स्फूर्तीदायी लेखन व विचार यावर परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावीत.
द्विशताब्दी जयंती वर्षा निमित्त ११ एप्रिल २०२७ पर्यंत
आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत चर्चासत्रे, शैक्षणिक प्रबंध सादरीकरण, महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह, पथनाट्य, एकपात्री नाटक, जलसंवर्धन अभियान, स्वच्छता अभियान, शाळा स्तरावर भित्तीपत्रक अभियान, कार्यशाळा आयोजित कराव्यात, असे शासनाचे निर्देश आहेत.
००००


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .