पुणे (शालेय वृत्तसेवा):
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अ भा शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंडळाच्या पुणे व नागपूर विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपूर विभागीय अध्यक्ष श्री किशोर चलाख सर व विभागीय कार्यकारिणीने दुपारी काव्यसंमेलन आयोजित केले होते. उत्कृष्ट नियोजनामुळे बहारदार झालेल्या काव्यसंमेलनाचे विभागीय उपाध्यक्षा सौ जयश्री सातोकर मॅडम यांनी तितकेच बहारदार सूत्रसंचालन करुन बहार आणली. तर संध्याकाळी पुणे विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश साखरे सर यांनी, 'व्याकरण हा भाषेचा पाया आहे.' या विषयावर व्याख्याते डॉ. श्रीकांत पाटील सर,कोल्हापूर यांचे आणि 'मराठी भाषेची प्राचिनता आणि तिची सद्यस्थिती' या विषयावर व्याख्याते श्री विजय जंगम सर, सांगली यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित केले होते. दोन्ही व्याख्यात्यांचे विवेचन अर्थपूर्ण आणि ओघवते होते. तर सौ मनीषा पाटील मॅडम या व्याख्यानाचे निवेदन करताना तितक्याच खास शैलीत समिक्षा केली.
यावेळी मंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री सचिन कुसनाळे सर, राज्य सचिव श्री विजय जोगमार्गे सर, अमरावती विभागीय अध्यक्ष श्री बाबाराव डोईजड सर ,कोकण विभागीय अध्यक्ष सौ हर्षल साबळे यांनी उपस्थित राहून मनोबल वाढवले. तर कोकण विभागीय अध्यक्ष सौ हर्षल साबळे मॅडमही यावेळी उपस्थित होत्या.


अतिसुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला
उत्तर द्याहटवाकार्यक्रमाचे संचालन उत्कृष्ट झाले.
हटवाकार्यक्रमाचे आयोजन चांगल्याप्रकारे करण्यात आले.
उत्तर द्याहटवा