नांदेड (शालेय वृत्तसेवा):
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यलेखा व वित्त अधिकारी , शिक्षणाधिकारी (प्रा . ) यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यापासून शिक्षकांचे मासिक वेतन एक ते पाच तारखेपर्यंत होणे अपेक्षित असताना 25 तारखेपर्यंत सुद्धा मासिक वेतन शिक्षकांना मिळत नाही. शिक्षकांना नाहक बँक, पतसंस्था ,एल आय सी आदी ठिकाणचा नाहक दंड भरावा लागत आहे .यास जबाबदार कोण ?नियमित वेतन एक तारखेला झालेच पाहिजे .तसेच भविष्य निर्वाह निधी स्लिप देण्यासाठी प्रदीर्घ प्रतिक्षा करून अखेर मिळाल्या त्यात अनेक चुका त्या दुरुस्तीसाठी जिल्हास्तरावर कॅम्प लावून तात्काळ भविष्य निर्वाह निधी स्लिपचा हा प्रश्न सोडविण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी म.पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी . एस . मंगनाळे ,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तस्लिम शेख, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुणके ,अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद राठोड ,शिक्षक काँग्रेसचे बाबुराव कैलासे ,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे एल.बी.चव्हाण ,पुरोगामी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे ,उर्दू शिक्षक संघटनेचे रऊफ सर, संजय खानसोळे ,सूर्यकांत गच्चे, एम . ए . खदीर ,जी.बी.मोरे एस.जी.माचनवार , जगदिश मलगे आदी शिक्षक उपस्थित होते.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .