शिक्षणमंत्री ना.वर्षा ताई गायकवाड यांना हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या वतीने निवेदन सादर!

शालेयवृत्त सेवा
0

 


शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न त्वरित सोडण्यात यावे- शेख अब्दुल रहीम


औरंगाबाद/ मुंबई: हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन च्या वतीने मुंबईत  शिक्षणमंत्री ना. वर्षा ताई गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन प्रथम त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या परंपरा नुसार पुस्तक शाल व एक शानदार मोमेंटो देऊन शुभेच्छा देण्यात आली व चर्चा करून एक निवेदन सादर केले व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याची विनंती केली व एक प्रत शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त शिक्षण सचिव वंदना कृष्ण मॅम यांना ही सादर करण्यात आले.


१) अघोषित शाळांना घोषित करून प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे.

(२) राज्यातील २०% मंजूर शाळांना प्रचलित नियमानुसार १००% अनुदान देण्यात यावे.

 (३) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी.

 (४) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू करण्यात यावी.

(५)  शिक्षण सेवक मानधन मध्ये तातडीने वाढ करण्यात यावी.

        व तसेच आजाद मैदानात शिक्षक समनव्य संघ तर्फे बेमुदत आमरण उपोषण सुरू याकळे ही त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर शिक्षकांच्या प्रलंबित मांगण्या मंजूर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. शिष्टमंडळात हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, शाहरुख पठाण, शफीक पठाण, शेख वसीम, शेख जफर आदींचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)