नांदेड ( रवी ढगे ) :
मारतळा दि 27 फेब्रुवारी 2021 आज मारतळा येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे नेहमी जागतिक ,राष्ट्रीय दिवस मोठ्या उत्साहात साजरे करतात त्याप्रमाणेच हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी या दिनाचे जनक कुसुमाग्रज यांच्या महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रमा त्यांनी घेतले या विषयी सर्वांना माहिती दिली खरंतर महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले.
'मराठी भाषा गौरव दिन' २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा साजरा करण्यात येतो हे ही त्यांनी सांगितले नंतर शाळेतील मुलांना रोजच्या व्यवहारात आपण मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शब्दांचा वापर करतो असे जवळपास 90 शब्द उदाहरणात जसे माईक साठी मराठी शब्द ध्वनी ग्राहक यंत्र असे गंमतीदार शब्द मुलांना सांगण्यात आले व त्या शब्दांना मराठी शब्द कोणता हे समजून सांगण्यात आले नंतर सर्व शब्द मोठ्या कार्ड सीटवर लिहून संग्रही ठेवण्यात आले आहे सध्या कोरोनाचे संकट असल्याने वर्ग 5 ते 8 चे वर्ग ऑफलाइन वर्ग कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू आहेत हा दिवस सुद्धा सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्या बुद्धीला एकप्रकारे चालना मिळाली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे, मु अ आनंद दरेंगावे, बालाजी प्यारलवार, माधुरी मलदोडे, जयश्री बारोळे,रमेश हणमंते व विद्यार्थी उपस्थितीत होते


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .