निळा जिल्हा परिषद शाळेत विज्ञान प्रदर्शनाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या प्रयोगाचे केले कौतूक !

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( कैलास पोहरे ):

             जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी विज्ञान दिन या विषयी श्री पोहरे सर यांनी या दिवसाचे महत्व थोडक्यात सांगितले. भारताचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही.रमन  यांनी 28/02/1928 ला पारदर्शी पदार्थ मधून प्रकाश प्रवास करताना त्याची दिशा बदलता येते.आणि एका प्रकाश किरणात सात रंग असतात त्या सात रंगांचे मिश्रण म्हणजे पांढरा रंग.त्यांच्या याच कार्याची दाखल जागतिक लेव्हल वर घेण्यात आली आणि 1930 ला त्यांना भौतिक शास्त्राचे नोबेल मिळाले.

भारत सरकारने त्यांना 1955 ला त्यांचा भारत रत्न हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला.त्याच्या कार्याची ओळख कायम स्वरूपी व्हावी म्हणून भारत सरकारने 1986 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.या कार्याची ओळख व्हावी म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री चोंडे सर यांनी या दिवसाचं महत्व लक्ष्यात घेऊन 27/02/21 ला आपल्या शाळेत विज्ञान दिन साजरा करण्याचि परवानगी दिली.

            विज्ञान शिक्षिका आदरणीय रत्नपारखी मॅडम यांनी याची पूर्वतयारी म्हणून दिनांक 26/02/21 रोजी सायंकाळी सात वाजता सहभागी मुलांना गूगल मित्रा द्वारे मार्गदर्शन केले. त्यास भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि त्याचेच फलित म्हणून आज एकून 16 मुलांनी सहभाग घेतला. या कामी त्यांना श्री बेळगे सर,गंजेवार मॅडम,कर्णेवार मॅडम आणि मोखण्डपल्ले मॅडम यांनी मार्गदर्शन आणि प्रयोगाची मांडणी करण्यासाठी मदत केली.आज मुलांनी अतिशय उत्कृष्ट रित्या त्यांचे सादरीकरण केले. पुढील मुलांनी सहभाग घेतला.



1)गायत्री निवृत्ती जोगदंड

प्रयोग : मुळाचा अभ्यास

हेतू : मुळाच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे.

2)विद्या श्रीधर जोगदंड

प्रयोग : हवेचे वस्तुमान /वजन आणि दाब सिद्ध करून दाखवणे.

3)अनुजा गोविंदराव जोगदंड

प्रयोग : निरनिराळ्या मृदेचे गुणधर्म अभ्यासणे

4)साक्षी संजय जोगदंड

प्रयोग : अन्नभेसळ रोखने

हेतू : अंनत केलेली भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगाच्या माध्यमातून तपासणी.

5)आत्माराम गणपती शिंदे आणि श्रावण गोविंदराव कदम

प्रयोग : पवनचक्की

6)शुभम आनंदराव जोगदंड

प्रयोग : तारबाईन पासून वीज निर्मिती करणे.

7)कोमल व्यंकटी जोगदंड

प्रयोग : फुलांची रचना

8)पूनम माधवअप्पा हेसे

प्रयोग : उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थाचे प्रसारण व अकुंचन अभ्यासणे.

9)श्रेय्या प्रभाकर जोगदंड

प्रयोग : विविध ठिकाणच्या मातीची संरचना भिन्न असते.

10)विष्णु रामराव कदम

प्रयोग : सूक्ष्म जिवंचा आढळून आणि अभ्यास.

11)अंजली व्यंकटी जोगदंड

प्रयोग : मातीचे ठार आणि त्यांचा अभ्यास

12)प्रतिक्षा हनुमान कदम

प्रयोग : विद्युत चुंबक

13)ऋतुजा बालाजी जोगदंड

प्रयोग : पदार्थच्या अवस्था

14)शिवकन्या माधव कदम

प्रयोग : चुंबकाचे गुणधर्म अभ्यासणे.

15)श्रद्धा नागोराव हिंगोले

प्रयोग : कप्पीचे कार्यक्रम अभ्यासणे.

16)चंचल नगरत्न हिंगोले

प्रयोग : तरफांचे प्रकार.



            वरील 16 प्रयोगाचे 17 विध्यार्त्यांनी अतिशय सुंदर रित्या सादरीकरण केले. कोविड चे सर्व नियम पाळून आजचा विज्ञान प्रदर्शन कमी गर्दीमध्ये पार पडले.या कामी सहभागी विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे महत्व पूर्ण योगदान लाभले.या प्रदर्शनासाठी मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभा भारती मॅडम आणि केंद्र प्रमुख श्री धोपटे व्ही. एस.यांनी शुभेच्छा दिल्या.

         सहभागी सर्व घटकांचे श्री बेळगे सर यांनी आभारी मानले. आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. एकंदरीत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)