अमृता ही पैजा जिंके.. माझी माय मराठी!

शालेयवृत्त सेवा
0

 


   

२७फ्रेबुवारी म्हणजे कुसुमाग्रजाचां जन्मदिन.हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणुन साजरा केला जातो "अमृताही पैजा जिंके ",असे मराठीविषयी ज्ञानदेवांनी म्हणले आहे.'जे जे वांछील,ते ते लाहो',असे म्हण्याचे सामर्थ मराठीत आहे.विश्वबंधुतेचे पसायदान ज्ञानेश्वरांनी मराठीतच गायले.वैश्विक बंधुता निर्माण करण्याचे सामर्थ्य हे मराठीतच आहे.अकराव्या शतकात महानुभव पंथाच्या ओव्या मराठीत लिहल्या गेल्या.महानुपंथाचे साहित्य मराठीत निर्माण झाले.तेराव्या शतकात मराठी ला सामर्थ्यवान करण्याचे ज्ञानेश्वरांनी केलं.सोळाव्या शतकात शिवरायांनी शब्दकोष तयार केला.स्वःताची राजमुद्राही मराठीतच तयार केली."मुद्रा भद्राय राजयते" ही मुद्रा मराठीतच होती.मराठी खुप प्राचीन आहे.काळाचाया ओघात तिच्यावर खूप आक्रमण झाली.अपभ्रंश होत गेले,पण तरीही माझी मायमराठी नित्यनवीन राहिली.भाषेचा साज उलट अधिक अधिक खुलत गेला.मराठी अधिक समृध्द होत गेली.

          मराठीच्या अनेक बोली आज सशक्तपणे बोलताना दिसताता.विदर्भाची वर्‍हाडी,कोकणाची कोकणी,प.महाराष्ट्राची मर्‍दानी,खानदेशी,मराठवाडीची मराठवाडी किती म्हणुन सांगु.खरचं मराठी प्रांताप्रमाणे खुलत गेली.मुंबईला टपोरी,पुण्यांची पुणेरी प्रमाणबध्द,कोल्हापुरची झणाट मिरचीसारखी तिखट रांगडी,सातार्‍याची रगेल व रंगेल किती बोली बोल्या जातात मराठीच्या.सोलापुरच्या मराठीचा बाज ढंण वेगळाच.तेलगु कन्नड मिश्रित मराठी वेगळा ठसा उमटवते मनावर.उस्मानाबाद व लातुरी बोली तर जिव्हाळा,ओलावा मातृस्पर्शाचा अलगद अनुभव देतात.नागपुरी लिहाज वेगळाच.बोलीनी  मराठी भाषेचं दालन मात्र समृध्द केल.बिड,जालना नांदेडी बोली माणुसकीची भाषा शिकवते.पुणेरी मराठीवर प्रमाणबध्दतेचे संस्कार करते.

     खाडिलकर,दांडेकर,तेंडुलकर,आचार्य अत्रे,गडकरी, सबनिस, गोखले,पु.ल.देशपांडे यांची प्रतिभावान नाटक यांनी मराठी वाचकवर्ग समृध्द केला.मराठी भाषेची उंची हिमालयासारखी वाढवली.

   विं.दा.करंदिकर,वि.वा.शिरवाडकर,इ.दिरासंत,बापट,गोविंदाग्रज,केशवसुत,केशवकुमार*यांनी कवितातुन मराठीला श्रीमंती प्रात करुन दिली.मराठीचे साहीत्य या साहित्यिकांनी हिमालयाच्या उंचीवर नेवुन ठेवले.म्हणुनच आजही मराठीचे वैभव टिकून आहे.

        द.मा.मिरासदार,शंकरराव खरात,वि.स.खांडेकर,अण्णाभाऊ साठे,दया पवार,लक्ष्मण माने,लक्ष्मण गायकवाड, शरणकुमार लिंबाळे यांनी ग्रामीण दलित साहित्यात मराठीचे  साहित्य उज्वल केले.

     मराठीची भुरळ अनेकांना पडली.फादर द्रिब्रिटो फान्सिस,म .गांधी,भगतसिंह,सुखदेव,टागोर इ.नी  मराठी शिकण्याचा प्रयत्न केला.स्वातंत्र्याची चळवळ महाराष्ट्रात प्रथम सुरु झाली. कारण मराठीत निघणारी वृत्तपत्रे ही क्रांतीकारकाचे हत्यार होते.मराठी भाषेचे स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान आहे.मराठी हिमालयासारखी उत्तुंग व धिरोदत्त आहे.ती दशांगुळे व्यापुन विस्तारली आहे.मराठीची सांस्कृतिक श्रीमंती व वैभव साहित्यास अधिक समृध्द करत आहे.

             आज मराठीस अवकळा प्राप्त होत आहे.इंग्रजी शिकणे,बोलणे,शाळेत जाणे,आधुनिक मानले जाते.मराठी बोलणे,शाळेत जाणे,चित्रपट पाहणे हे कमीपणाचे मानले जाते.पण मराठीची वैचारिक श्रीमंती समजून घेण्यात कंगालपणा का दाखवत आहोत.आपले वैचारिक दारिद्रय का संपत नाही.ज्या  मराठीचा गौरव जगभर होतो ती बोलने म्हणजे गरिबी का वाटते,ही दिनता संपावी

          इंग्रजी जागतिक राजभाषा आहे. ती जगाच्या ज्ञानाची खिडकी आहे.ती शिकणे आवश्यक आहेच,पण तरीही मातृभाषा मराठी र्‍हदयावर कोरली जावी. मराठी राजभाषा गौरव  दिनानिमित्त एवढ चिंतन करु व वैश्विक मराठी अधिक समृध्द करु.

     कवि  कुसुमाग्रजांना जन्मदिनानिमित्त शतशः नमः आभिमान आहे मला, "मी  मराठी असल्याचा",गर्व आहे "मी महाराष्ट्रीयन असल्याचा"

     जय महाराष्ट्र!



-पंकज राजेंद्र कासार काटकर

  सहशिक्षक,जि.प..प्रा.शा.काटी  

 ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद

  मुपो.काटी.ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद

भ्रमणभाष्य९७६४५६१८८१

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)