महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना नांदेडच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांना निवेदन..

शालेयवृत्त सेवा
0

              


 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना नांदेडच्यावतीने  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व्ही .आर.पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर    यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍न मागण्या सोडण्याबाबत  संघटनात्मक निवेदन देण्यात आले.                                      


शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या 2019 मध्ये होणाऱ्या ऑनलाईन घेण्यात यावे .जुन्या अवघड घोषीत  क्षेत्रातील शिक्षकांना बदल यासाठी संवर्ग 3 चा लाभ देण्यात यावा.सी.पी.एम. योजनेद्वारे शिक्षकांचे मासिक वेतन एक तारखेला करण्यात यावे  .जिल्ह्यातील सर्व जि प शाळेतील विद्यार्थ्यांना जि.प.च्या शेषनिधीतुन  मोफत गणवेश देण्यात यावे  .जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोलीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून जीर्ण वर्गखोल्या तात्काळ पाडण्यात याव्यात .महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत पूर्ववत सुरू करावी .तापमान वाढल्यामुळे शाळेच्या वेळेत  बदल करण्यात यावे. कडक  लाॕकडाऊन असल्यामुळे 25 मार्च के 04 एप्रिल पर्यंत वर्क फार्महोम ची सवलत शिक्षकांना देण्यात यावी  .


   राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे ,जिल्हा सरचिटणीस  बाबुराव माडगे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.  सदरील मागण्या /प्रश्न पूर्ण करण्यासाठी  जिल्हाधिकारी  यांनी आश्वासन दिले  .  लाॕकडाऊन च्या काळात शिक्षकांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवून आपल्या  शाळेचे कामकाज करू शकता . तुम्हाला कोणी अडवणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.    


                        

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)