नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आज बैठक झाली. यात नांदेड जिल्ह्यातील येलो लाईन कॅम्पेनींग व तंबाखू मुक्त शाळांचा आढावा घेण्यात आला येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा तंबाखू होण्यासाठी येलो लाईन कॅम्पेनींग अंतर्गत निवडलेल्या शाळा इतर शाळांसाठी आदर्श शाळा ठरणार आहेत.
तसेच यावेळी प्राथमिक शिक्षण संचनालय व सलाम मुबंई फाउंडेशन सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने सुरू असलेल्या तंबाखू मुक्त शाळा अभियानासाठी आवश्यक असलेल्या तंबाखूमुक्त आरोग्यदायी जीवन महाराष्ट्र राज्य 2020 -21 या पुस्तकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकात सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ साधना तायडे, सह संचालक प्राथमिक शिक्षण विभाग पुणे श्री दिनकर टेमकर यांचे शुभेच्छा संदेश व तंबाखूचे प्रकार, दुष्परिणाम ,तंबाखू व कोविड 19 यांचा सहसंबंध त्याबाबत जनजागृती,भारतातील तंबाखू निंयंत्रण कायदा ,तंबाखू शैक्षणिक संस्था धोरण व तंबाखूमुक्त शाळेचे नऊ निकष बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे .
यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री दिलीपकुमार बनसोडे, शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधिक्षक श्री येरपूवार ,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा संपर्क अधिकारी डॉ साईप्रसाद शिंदे , तंबाखू मुक्त शाळा अभियान जिल्हा परिषद नांदेड जिल्हा समनव्यक श्री रवी ढगे , श्री बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .