सामान्य ज्ञान स्पर्धेत नूतनच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नुकतीच शिवजन्मोत्सव २०२१ च्या निमित्ताने 'संघर्ष युवा प्रतिष्ठान, भोकर' तर्फे आयोजीत केलेल्या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नूतन भोकर च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिके पटकावत या स्पर्धेत नूतन शाळेच्या गुणवत्तेचा ठसा उमटविला. आज या सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण नूतन शाळेत भोकरचे उपविभागिय अधिकारी मा.डाॅ.राजेंद्र खंदारे यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमास नूतन शाळेचे केंद्रप्रमुख श्री. बालाजी पडलवार साहेब, मुख्याध्यापक श्री. मारोती पट्टेवाड सर, माजी मुख्याध्यापक श्री. आनंदा नागलवाड सर, नूतन शाळेचे सर्व शिक्षकवृंद तसेच संघर्ष युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा.खंदारे साहेब म्हणाले की,"बालवयात अवांतर वाचनाची सवय तसेच स्पर्धा परीक्षेतील सहभागाने जीवनात यशस्वी होता येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हेच यशस्वीतेचे खरे सूत्र आहे." 


सदर सामान्य ज्ञान परीक्षा भोकर शहरातील विविध शाळेच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी दिली त्यापैकी नूतन शाळेचे तब्बल १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून सातवील्या आदित्य अविनाश जाधव याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस सायकल तर त्याच वर्गातील साईराज बालाजी शिरडकर याने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्टडी चेअर वर आपले नाव कोरले. 

या स्पर्धेत यश मिळविल्याने आदित्य व साईराज या दोघांचेही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या दोघांचेही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.जयभीम पाटील साहेब, उपाध्यक्ष मा.संतोष रातोळे साहेब, केंद्रप्रमुख मा.बालाजी पडलवार साहेब, मुख्याध्यापक मा.मारोती पट्टेवाड सर यांच्यासर शाळेतील सर्व शिक्षकवृंदाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)