तारीख ११ व १२ एप्रिल रोजी शिक्षकांचे होणार राज्यस्तरीय ऑनलाइन संमेलन : प्रत्येक जिल्ह्याच्या तीन शिक्षकांचा राज्य स्तरीय पुरस्काराने होणार सन्मान..

शालेयवृत्त सेवा
0

 



अखिल भारतीय शिक्षक, साहित्य, कला व क्रीडा मंडळ महाराष्ट्रचा उपक्रम !


मुंबई ( सचिन कुसनाळे ) :

अखिल भारतीय स्तरावरील शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ हे शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी तयार केलेले साहित्य मंडळ असून शिक्षक साहित्यिक कलाकार क्रीडापटूंचा समूह आहे.


मंडळ शासन नोंदणीकृत असून मंडळाच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा आहेत. संपूर्ण देशात लवकरच विस्तार होणार आहे. मंडळात प्राथमिक पासून महाविद्यालयापर्यंत सर्व विभागातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षक सहभागी आहेत. मंडळामार्फत शिक्षकासाठी मासिक राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन, काव्यगायन, कला व कलाविष्कार स्पर्धा दर महिन्याला घेण्यात येतात. या व्यतिरिक्त विशेष स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे, परिसंवाद, प्रदर्शने इत्यादी उपक्रम घेतले जातात.


मंडळातर्फे दिनांक 11 व 12 एप्रिल 2021 रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आवाहनानुसार ऑनलाइन घेण्यात येणार आहे. यावेळी चित्र फोटो, शिल्प प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम असा ऑनलाईन रंगतदार कार्यक्रम असणार आहे. संमेलनाचा पहिला टप्पा राज्यस्तरीय परिसंवाद व काव्यसंमेलन ऑनलाइन पार पडले आहे.


कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिक्षक साहित्य संमेलनाचा दुसरा टप्पाही ऑनलाइन पार पडणार आहे. साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा जिल्हाध्यक्ष सह सन्मान करण्यात येणार आहे. याचवेळी पुस्तक प्रदर्शन, कला प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 11 व 12 एप्रिल 2021 रोजी ऑनलाइन घेण्यात येणार असून मंडळाच्या यूट्यूब चैनलवर व इतर प्रसिद्धी माध्यमात मार्फत प्रसारित करण्यात येणार आहे.


शिक्षक संमेलनासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय शालेय शिक्षणमंत्री, माननीय क्रीडामंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री, माननीय सांस्कृतिक मंत्री यांच्यासह मान्यवरांना आमंत्रणे पाठवण्यात आली असून मंडळाचे संस्थापक व राज्यध्यक्ष माननीय नटराज मोरे हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.


कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्य सचिव विजय जोगमार्ग, उपाध्यक्ष शालिनी मेखा, कोषाध्यक्ष धनराज चव्हाण, कार्याध्यक्षा सुनिता साबळे, अनुपमा जाधव, गीता केदारे, महेंद्र खैरनार, संभाजी पोळ, प्रकाश साखरे, संतोष लुले, जिल्हाध्यक्ष शालीनी मेखा, मिताली तांबे, हर्शल साबळे, भिमरावजी पगारे, अमित आदवडे, विवेक कुवरा, संपत गरजे, सचिन कुसनाळे, गणेश लेंगरे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, जया नेरे, शर्मिला चत्रे, राजेश मोहिते, जयश्री काळविट, प्रकाश पारखे ,पद्माकर वाघुळकर, प्रा. कल्याण राऊत, डॉ. नंदकिशोर डंबाळे, रमेश मुनेश्वर, शिवशंकर डोईजड, शिवाजी जगताप, नानासाहेब बोराडे, शिवाजी निळकंठे, ममता राऊत, मिलिंद इंगळे, गुलाब सोनोणे, बाबाराव डोईजड, वसंत गोमासे, पंडित लोंढे या मान्यवरांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)