सेवा पुस्तीकेत नोंदी अपूर्ण ; याला जबाबदार कोण ?
मुंबई ( उदय नरे ) :
शिक्षकांची सेवा पुस्तिका हा त्यांच्या नोकरीतील अविभाज्य घटक. सेवा पुस्तिका म्हणजे "सर्विस बुक" प्रत्येक शिक्षकाने केलेल्या कामाची नोंद या सर्विस बुक मध्ये असते. सेवा पुस्तकांमध्ये दरवर्षी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या कर्मचारी वर्गाच्या कामाची ची नोंद घेणे अत्यावश्यक असते.
आज राज्यामध्ये कोव्हीड 19 प्रादुर्भावामुळे अनेक शिक्षकांच्या सेवा पुस्तकात नोंदी झाल्या नाहीत. सेवा निवृत्त झाली आहे परंतु अपुर्ण कर्मचारी वर्गामुळे सेवा निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या फायली लाल फितीमध्ये अडकल्यामुळे अनेकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
शिक्षकांच्या फाईली शिक्षण विभागातून अर्थ विभागात मंजुरीसाठी पाठविण्यात येतात. दुर्दैवाने आज कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी फायली मंजुर झाल्या नाहीत.
मुंबईतील काही शाळा मध्ये तर अनेक वर्षे सर्विस बुक अद्याप अद्यवतच केलेली नाहीत अशी माहिती समोर आली आहे . सेवा पुस्तकातील नोंदी अद्ययावत केल्या नाहीत यामुळे अनेक शिक्षकांना निवृत्तिवेतन मिळत नाही सर्विस बुक नोंदीची त्रुटीमुळे अनेकदा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते सर्विस बुक तयार करणे या शाळेतील क्लार्क म्हणजे लिपिकाचे काम असते परंतु अनेकदा लिपिक आपले काम वेळेवर करत नसल्यामुळे आणि मुख्याध्यापकांचा त्यांच्यावर वचक नसल्यामुळे शिक्षकांना आर्थिक भुर्दंड याला सामोरे जावे लागते शिक्षण विभागाकडून प्रत्येक सर्विस बुक हे अद्यावत झाल्यानंतर त्याच्या वरती सही शिक्का शिक्षण निरीक्षक कार्यालयातून दिरंगाई केली जाते असे सुत्रांनी सांगितले. शिक्षण निरीक्षक कार्यालयात सर्विस पुस्तक पोहचल्यावर चुकीच्या नोंदी असतात, अनेक वर्षांची सर्विस बुक अद्यावत झाली नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे आता तर सर्विस बुक याच्या अद्यावत नोंदी ठेवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो शिक्षकाने त्याच्या सेवाकाळात केलेल्या प्रशिक्षण, पुरस्कार, वैद्यकीय रजा, किरकोळ रजा व केलेले उल्लेखनीय कार्य, नियुक्ती व निवृत्तीच्या वयाच्या नोंदी, शैक्षणिक अर्हता, वेळोवेळी केलेल्या प्रशिक्षण व इतर कार्यालयीन नोंदी केल्या जातात तसेच शिक्षकांनी केलेल्या गुन्ह्यांची व तक्रारीची नोंद केली जाते आणि आणि शिक्षकांचे हे सेवापुस्तक म्हणजे त्याची कुंडलीच असते परंतु या कुंडलीला नेहमीच अद्यावत करणे हे शिक्षकांचे काम असते त्या दोन प्रती प्राप्त होतात एक प्रत शिक्षका जवळ असते व दुसरी शाळेतील कार्यालयात असते परंतु दुर्देवाने अनेकदा या शिक्षकांच्या हातात हे सर्विस बुक अद्यावत नोंदी करून मिळत नाही अशी तक्रार काही शिक्षकांनी केली आहे. निवृत्तीच्या काळात शेवटच्या क्षणी सेवा पुस्तकात नोंदी करून सादर केले जाते.
सेवापुस्तकातील नोंदी ह्या अर्धवट असतात आणि याचे ज्ञान शिक्षकांनाही नसते , शिक्षकांची पगार वाढ त्यांना देण्याात आलेले मेमो, रजा, विशेष प्रशिक्षण बरोबर आहे काही नाही हे हेे मुख्याध्यापकांनी तपासून ते साक्षांकन करणे हे महत्त्वाचे असते यावेळी प्रत्येक शिक्षकांनी आपले सेवा पुस्तक अद्यावत करून त्याची नोंद आपल्याकडे घेणे आवश्यक आहेत व त्यातील त्रुटी असतील तर तात्काळ शाळेतील क्लार्क निदर्शनास आणून त्या दुरुस्ततव केल्य्या पाहिजे. शिक्षण निरीक्षक कार्यालयातून शाळेतून येणाऱ्या सेवा पुस्तकाच्या व नोंदीची खातरजमा करणे आवश्यक आहे आणि हे काम वेळेवर झाले नसेल तर त्याचा जाब विचारण्याचा अधिकार शिक्षक निरीक्षकांना आहे. आपले सेेवा पुस्तक व त्यातील नोंदी पाहण्यासाठी शिक्षकांनी तत्पर झाले पााहिजे. शिक्षक, लिपिक, व्यवस्थापक, मुख्याध्यापक व शिक्षण निरीक्षक कार्यालय यांच्यातील समन्वयातूनच सेवा पुस्तिका हा शिक्षकांचा महत्वपूर्ण दस्तावेज केवळ त्यांच्या निवृत्तीसाठीच नव्हे तर बदली, बढती व पुरस्कार यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .