सावित्रीच्या लेकींचा कोरोना जागृतीसाठी पुढाकार.. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेचा ' गगणभरारी ' उपक्रम !

शालेयवृत्त सेवा
0

 



गावोगावी सादर होणार कोरोना जागृती पथनाट्य


नाशिक ( मनिषा सावळे ) :

कोरोनाचे वाढते संकट बघता आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षिका वर्गाने गगनभरारी नावाने ग्रुप स्थापन करीत स्वयंपुर्तीने कोरोनावर आधारित कोरोना जनजागृती पथनाट्य तयार करत गावोगावी सादर करण्यास सुरुवात केली आहे. 


            महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, प्रमोद शुक्ला, डॉ जतीन कापडणीस, नगरसेविका पुष्पा गंगावणे, ज्योती भोसले, राजेश गंगावणे यांच्या समक्ष कोरोना जागृतीपर पथनाट्य उत्कृष्ट रीतीने पोवाड्यातून सवाद्य संगीतपर सादर करण्यात आले यातून कोरोना विषाणूची होणारी लागण, लक्षणे, घ्यावयाची काळजी, उपाययोजना तसेच लसीकरण याबाबत जागृती संदेश देण्यात येत आहे. यावेळी सदर पथनाट्याचे भुसे यांनी कौतुक करीत पुढील काळात पथनाट्य सादर करण्यासाठी नियोजन करून गावोगावी प्रसारित करण्यासाठी मदत करण्याचे जाहीर केले. 


पथनाट्यसाठी साधना ब्राह्मणकर कुकाणे, मनीषा सावळे महालक्ष्मीनगर, मनीषा पाटील अस्ताने, दिपाली शिंदे मानके, संगीता पाटील पिंपळगाव, मनीषा ठाकूर सरस्वती विद्यालय, शोभा बच्छाव टेहरे, ज्योती पाटील विंध्यवासिनी नगर, छाया देसले टिपे, मनीषा कुलकर्णी सरस्वती विद्यालय, लता सूर्यवंशी कंधाने, विजया भदाणे गणेशनगर, नुतन चौधरी टेहरे, छाया पाटील हनुमाननगर, अश्विनी सोनवणे पाटणे, जोत्स्ना काकळीज चिंचगव्हान, गटप्रमुख वैशाली भामरे माणके यांनी पात्रे सादर केलीत. यावेळी संघटना पदाधिकारी सुभाष पाटील, संजय पगार, वाल्मिक घरटे, शरद ठाकूर, निलेश नहिरे, सुरेश ब्राम्हणकर, सुनील पाटील, पवन कुलकर्णी आदी उपस्थित होते.


"मालेगाव तालुक्यातील महिला शिक्षिकांनी शाळा, कुटूंब सांभाळत समाजाप्रती वेळ देत कोरोना विषयीचा संपूर्ण गाभ्याचा विचार करून पथनाट्य सादर केले जात आहे. याद्वारे नागरिकांना उत्तम संदेश मिळणार आहे."

 - दादा भुसे, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)