नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार-२०२१ प्रदान..

शालेयवृत्त सेवा
0

 


सर फाउंडेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरमचा उपक्रम


नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर फाउंडेशन स्टेट इनोव्हेशन अंड रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र वूमन टीचर्स फोरम यांच्यावतीने नासिक जिल्ह्यातील ८ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार-२०२१ प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले .


यात मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालक्ष्मी नगर येथे कार्यरत प्राथमिक शिक्षिका श्रीमती मनिषा भगवान सावळे यांनी केलेल्या या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत सर फाउंडेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम यांच्या वतीने ऑनलाइन घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात माननीय श्रीमती अर्चना तांबे मॅडम( उपायुक्त, महिला व बालकल्याण विभाग) यांच्या हस्ते श्रीमती मनीषा सावळे यांना आभासी पद्धतीने प्रदान करण्यात आला. 


सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी माननीय श्रीम पुष्पावती पाटील( शिक्षण उपसंचालक नाशिक )माननीय श्रीमती अर्चना तांबे (उपायुक्त, महिला बाल कल्याण विभाग नासिक )श्रीमती रत्नप्रभा भालेराव( प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक) माननीय श्रीमती सुनिता धनगर (प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण विभाग नासिक) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. समवेत माननीय श्रीमती हेमा शिंदे वाघ( महिला राज्य समन्वयक सर फाउंडेशन) श्री सिद्धाराम माशाळे( राज्य समन्वयक सर फाउंडेशन )श्री बाळासाहेब वाघ (राज्य समन्वयक सर फाउंडेशन), श्री राज किरण चव्हाण (जिल्हा समन्वयक, सोलापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच नासिक जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक यांचीही उपस्थिती होती. 


श्रीमती मनीषा सावळे (मालेगाव) यांच्यासोबतच नलिनी अहिरे (निफाड) स्वाती मुसळे( बागलाण) अनुराधा तारगे (दिंडोरी) संध्या देवरे (चांदवड) विजया लिलके (नासिक) माधुरी पाटील (इगतपुरी) वैशाली भामरे (नाशिक मनपा) यांनादेखील पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सोपान दादा खैरनार सूत्रसंचालन श्रीम वैशाली सूर्यवंशी तर तांत्रिक कामकाज श्री हंसराज देसाई व श्रीमती कुंदा बच्छाव यांनी  पाहून आभार प्रकट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)