राज्यात 15 जून पासून ऑनलाइन शाळा सुरू.. सह्याद्री वाहिनीवर दररोज पाच तासाचे शिक्षण..

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई (शालेय वृत्तसेवा):

कोरोना महामार्गामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील शाळा ऑनलाईनच सुरू होणार आहे. 15 जून पासून विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षणाचे धडे अधिक प्रभावी असतील विद्या परिषदेने त्यासाठी विशेष नियोजन केले असून सह्याद्री वाहिनीवरील दररोज पाच तास शिक्षणासाठी मिळणार आहेत.


कोरणामुळे गेल्या वर्षी मुंबई आणि ठाणे शहरातील शाळा भरल्यास नाही राज्यातील काही ठिकाणी सप्टेंबर पासून शाळा सुरू झाल्या होत्या पण त्याही वर्षभर चाललेल्या नाहीत. या वर्षीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाईनच होणार आहे. घराघरात टीवी असल्याने यंदा सह्याद्री वाहिनीवरील शिक्षण देण्याचे नियोजन आहे यासाठी गतवर्षीपेक्षा यंदा जादा तास मंजुरी मिळवली आहे. दिवसातून पाच तास शिक्षणासाठी दिले जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नयेत म्हणून विद्या प्राधिकरणाच्या वतीने विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न असल्याचेही टेमकर यांनी सांगितले. प्रथम दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाचे नियोजन केले असून त्यानंतर पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. त्या संदर्भातील वेळापत्रक लवकरच शिक्षण आणि पालकांच्या माहितीसाठी देण्यात येणार असल्याचेही टेमकर म्हणाले. ऑनलाइन शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या युट्युब दूरदर्शन दीक्षा ॲप स्वाध्याय यासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते.


दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण मिळत आहे याद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी पाच तासांचे स्लॉट शिक्षणासाठी घेतले जात आहे पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावी आणि त्यानंतर सर्व इयत्ता चे तास वाढविली जाणार आहेत

-दिनकर टेमकर 

संचालक 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)