दिवाळीत वेतन होणार की नाही? याबाबत साशंकता !
सोलापूर ( शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षण विभागाने सुरु केलेल्या शालार्थ संचमान्यता इंटिग्रेशनमुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन ऐन दिवाळीत लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार नव्याने सुरु करण्यात आलेल्या प्रणालीत अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे संचमान्यतेत दाखवत नसल्यामुळे त्यांना प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पदवीधर शिक्षक यांच्या वेतनाबाबत निर्माण होत आहेत. ऐन दिवाळी सणात वेतन होणार की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
नवीन प्रणालीबाबत कोणतीच कार्यशाळा किंवा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले नाही. शाळांना याबाबतीत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत. दिवाळी सणात शिक्षकांचे वेतन तातडीने देण्यात यावे अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. सध्या दिवाळीचा सण असल्यामुळे सध्या प्रचलित पद्धतीने वेतन मंजूर करावे. पुढील महिन्यापासून शालार्थ इंटग्रेशन पद्धतीने वेतनाची प्रक्रिया राबविण्यात यावी अशी आग्रही मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. राज्य माध्यमिक विभाग संचालक यांच्या आदेशानुसार शालार्थ व संचमान्यता या दोन्ही दिवाळीपूर्वी सर्व शिक्षकांचे वेतन व्हावे.
प्रणालीचे इंटिग्रेशन केलेले असून शालार्थ मध्ये पे-बिल जनरेट करत असताना संचमान्यत्तेमधील पदांपेक्षा जास्त पदांचे बील अदा करत असल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर पे-बिलास मंजुरी दिल्यानंतर सदर पे-बिल पुढे पाठविण्यात येणार आहे. यात अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत.
शालार्थ मध्ये संचमान्यता पोस्ट मॅपिंग व युडायस कोड मॅपिंग ची प्रोसेस पूर्ण असणे अनिवार्य आहे. शाळा व कॉलेज स्तरावर पे-बिल जनरेट होईल. पे-बिल फॉरवर्ड करताना शालार्थ प्रणाली संचमान्यता प्रणाली मधून सदयस्थितीमध्ये उपलब्ध असलेल्या मंजूर पंदाचा तपशील तपासून जर संचमान्यतेपेक्षा जास्त पदांचे पे-बिल तयार झालेले असेल तर शालार्थ प्रणाली तसा मेसेज देणार आहे.
शाळा स्तरावरुन पाठविण्यात आलेले प्रस्ताव एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीने सादर करण्यात येणार आहे. एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर सदर पे-बिलाचा सविस्तर तपशील उपलब्ध होणार आहे. याठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतरच सदर पे-बिल हे पुढे फॉरवर्ड होणार आहे. सद्यस्थितीमध्ये खासगी अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी तांत्रिक सुविधा उपलब्ध झालेली असून पुढील आठवड्यामध्ये उच्च माध्यमिक कॉलेज करिता सदर सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे.
दिवाळीचा सण जवळ आला असताना इंटिग्रेशन प्रणालीमुळे वेतन रखडणे योग्य नाही. जुन्या पद्धतीने वेतन अदा करुन नवीण प्रणाली पुढील महिन्यापासून लागू करण्यात यावी. वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यासाठी प्रयत्न करावे.
- सुनील चव्हाण, प्रदेश महासचिव डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .