माझी शाळा जिल्हा परिषद शाळा , ऑनलाइन शिष्यवृत्ती परीक्षा मोफत मार्गदर्शन ग्रुप नायगाव चे 200 दिवस पूर्ण..

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आज दिनांक 10 जून 2021 रोजी DIET नांदेड चे प्राचार्य डॉ रवींद्र अंबेकर यांनी माझी शाळा जिल्हा परिषद शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन ग्रुप नायगाव या मोफत ऑनलाइन क्लासला भेट दिली. सोबत IT तज्ञा श्री  संतोष केंद्रे हे सुद्धा सहभागी झाले. नियमित क्लास चालू असताना प्राचार्य साहेबांनी सहभागी होऊन क्लास च्या विध्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधला. 


मार्च 2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे भारतामध्ये लॉकडाऊन चालू झाले. अख्खा भारत देश थांबलेलं असताना शैक्षणिक संस्था सुद्धा बंद झाल्या. परिणामी शाळा सुद्धा बंद झाले आणि विध्यार्थ्यांचे शिक्षण थांबले. जून मध्ये नवीन सत्रात शाळा चालू होईल असे वाटले होते, पण covid 19 चा प्रादुर्भाव काही कमी होत नव्हता म्हणून शाळा प्रारंभ झालेच नाहीत. आलेल्या संकटावर मात करून विध्यार्थ्यांचे शिक्षण चालू कसे करता येईल हे पाहत असताना. DIET नांदेड च्या मार्गदर्शनाखाली  नायगाव येथील शिक्षिका शीतल भालेकर यांनी ऑनलाइन क्लास चालू केला. 


याअगोदर अनेक शिक्षक गृहभेटी देऊन स्वाध्याय पूर्ण करून घेत होते. काही शिक्षक ऑनलाइन व्हिडिओ पाठवून अभ्यास करून घेत होते. अश्या प्रकारे मुलांचे शिक्षण कसे बसे चालू झाले आणि मुले शिकू लागली. पण माझ्या मनात वेगळाच विचार चालू होता. ऑनलाइन पध्दतीने मुले शिकतीलही, पण हुशार विध्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप परीक्षेचे काय? त्या  मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कसे करणार? हा प्रश्न मनाला भेडसावत होता. म्हणून सप्टेंबर महिन्यात त्यांच्या शाळेतील इयत्ता 5 वी साठी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवणे चालू केला. 


पूर्वतयारी म्हणून प्रथम विध्यार्थ्यांच्या पालकांना भेटून त्यांचा व्हाट्सअप्प ग्रुप तयार केला. ग्रुपचे नाव "माझी शाळा जिल्हा परिषद शाळा" असे ठेवण्यात आले. हे नाव ठेवण्याचे कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा एकमेव उद्धेश होता. पालकांना व विध्यार्थ्यांना zoom अँप ची माहिती दिली. ऑनलाइन शिक्षणातील अडचणी दूर केल्या. अश्याप्रकरे ऑनलाइन शिक्षण चालू केले.


प्रथमतः  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील 7 विध्यार्थी जॉईन होऊ लागले. तसेच  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी शाळेतील प्रारंभी 5 मुले सहभागी झाली होती. मुले फारच कमी होती म्हणून zoom लिंक इतर शाळेच्या विध्यार्थ्यांना सुद्धा दिली. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील मिळून 25 ते 30 विद्यार्थी सहभागी होत होती. सहभागी विध्यार्थ्यांना सप्टेंबर 2020 ते मार्च 2020 पर्यंत दररोज सायंकाळी 6 : 20 ते 7 पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचे दोन पेपर चे चारही विषय ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात आले. अश्याप्रकरे मार्चमध्ये घटक शिकवणे पूर्ण झाले. मुख्य परीक्षा मे 2021 मध्ये असल्याने मार्च ते एप्रिल महिन्यात उर्वरित दिवस पूर्ण करण्यासाठी  मुख्यपरीक्षेपर्यंत प्रश्न पत्रिका सराव घेण्यासाठी "चला स्कॉलर होऊ" हा उपक्रम चालू केला.


या उपक्रमात 13 मार्च 2021 पासून सराव परीक्षा घेण्यात येत आहेत.. आजपर्यंत क्लासमध्ये 13 प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आले आहेत.  दर शनिवारी पेपर 1(प्रथम भाषा व गणित) आणि रविवारी पेपर 2 ( तृतीय भाषा व बुद्धिमत्ता) पेपर सोडवून घेतल्या जाते. दिवसभरात केंव्हाही दीड तासात पेपर सोडवण्याची परवानगी देण्यात येत आहे.  


संध्याकाळी ऑनलाइन क्लासमध्ये सोडवलेले पेपर तपासून घेण्यात येते. सोमवार ते शुक्रवार या दिवशी पेपर मधील अवघड प्रश्न, चुकलेले प्रश्न विध्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येत आहे.13 सराव परिक्षेमध्ये   बोर्डाच्या प्रश्नपत्रिका 2017, 2018, 2019 व 2020 या चार प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून घेण्यात आले आहेत. तसेच विविध प्रकाशनचे उदा. पक्का पाया प्रकाशन पुणे, विद्याभारती  प्रकाशन लातूर, जिनिअस प्रकाशन उस्मानाबाद या प्रकाशनाची प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून घेण्यात आले आहेत. 


प्रारंभी मुलांना 300 पैकी 150 ते 200 गुण मिळत होती. आज रोजी 13  प्रश्नपत्रिका सराव झाल्यावर 250 च्या पुढे गुण मिळत आहेत. क्लास चे काही विध्यार्थी 290 पर्यंत गुण मिळत आहेत. "चला स्कॉलर होऊ या" या उपक्रमाचे 200  दिवस पूर्ण झालेले आहेत. या उपक्रमाचे सर्व श्रेय आम्ही गटसाधन केंद्र नायगाव चे विषयसाधन व्यक्ती कै. उमेश पाटिल सर यांना देतो. क्लास चालू करण्यासाठी सरांचे सहकार्य आणि प्रेरणा व पुढाकार पाटील पाटील सरांचा आहे.


सदरील उपक्रम राबविण्यासाठी  शीतल भालेकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसी येथिल शिक्षक भद्रे सर यांचे  खूप चांगले सहकार्य मिळाले आहे. भालेकर यांनी बुद्धिमत्ता व मराठी तर गणित व इंग्रजी भद्रे सरांनी अध्यापन केलेलं आहे. उपक्रमात वृषाली होळीलकर मॅडम, शेख सर यांनी सुद्धा अध्यापन केलेलं आहे.


 क्लास चालू करत असताना तालुक्यातील अधिकारी याचे सुद्धा सहकार्य मिळाले. याकामी पंचायत समिती नायगावचे  गटशिक्षणाधिकारी सौ कोठेकर मॅडम यांनी आम्हाला वेळेवेळो मार्गदर्शन केले आहेत, तसेच केंद्रप्रमुख पवळे सर, नलबलवार सर, कदम सर, मुख्याध्यापक राजपूत सर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)