राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर..

शालेयवृत्त सेवा
0

 



जिल्हाध्यक्षपदी डॉ. हेमंत कार्ले, राज्य प्रतिनिधी डॉ. शेख, विभाग प्रतिनिधी प्रलोभ कुलकर्णी, जिल्हा नेते अरुण अतनुरे, सरचिटणीसपदी रमेश मुनेश्वर यांची निवड !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

राष्ट्रीय -राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र ( नोंदणीकृत ) जिल्हा शाखा नांदेडची कार्यकारणी नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी डॉ. हेमंत कार्ले, राज्य प्रतिनिधी डॉ. शेख, विभाग प्रतिनिधी प्रलोभ कुलकर्णी, जिल्हा नेते अरुण अतनुरे, सरचिटणीसपदी रमेश मुनेश्वर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर उपस्थित होते.


           सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांसाठी ही कार्यकारिणी निवडली असून यामध्ये राज्य प्रतिनिधी म्हणून डॉ. शेख वहिबोद्दीन, मराठवाडा विभाग प्रतिनिधी म्हणून प्रलोभ कुलकर्णी, जिल्हा नेते म्हणून अरुण अतनूरे, जिल्हाध्यक्षपदी डॉ. हेमंत कार्ले, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुनिल आलुरकर, विजय गादेवार, छाया बैस, जिल्हा सरचिटणीसपदी रमेश मुनेश्वर, जिल्हा कार्याध्यक्षपदी गनू जाधव, जिल्हा सल्लागार म्हणून डॉ. देविदास तारू, राजेश कुलकर्णी, शालिनी सेलूकर, जिल्हा कोषाध्यक्षपदी मिलिंद जाधव, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून राजू भद्रे, जिल्हा मुख्यसंघटक म्हणून डॉ. शिवाजी कराळे, जिल्हासंपर्कप्रमुख म्हणून डॉ. प्रज्ञेश भोजनकर हे काम पाहतील. जिल्हा संघटक म्हणून सुभाष देगलूरकर, चव्हाण सी. जी, हणमंत जाधव, शेख इरफान अहमद, सिराज अनवर यांची निवड झाली.


           राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या समस्येसाठी ही संघटना कार्यरत असून पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाने ओळखपत्र द्यावेत, दोन जादा वेतनवाढी पुर्वरत सुरू कराव्यात, शासनाच्या विविध समित्यावर पुरस्कार प्राप्त शिक्षक घ्यावेत, प्रमोशन मध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा विचार व्हावा. अशा समस्येसाठी ही संघटना कार्यरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)