नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आज शनिवार दुपारी 12:45 ला शिक्षणाधिकारी प्राथमिक नांदेड मा.प्रशांतजी दिग्रसकर साहेब, मा.मठपती साहेब शि.अ. उपशिक्षणाधिकारी मा.बंडू आमदूरकर यांनी केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.नांदेड या शाळेस भेट दिली.त्याप्रसंगी शा.पो.आ.खोलीची, परिसराची स्वच्छतागृहाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
शालेय परिसरात 100 झाडे लावावीत.सेतू अभ्यासाच्या दैनंदिन नोंदी, वर्चुअल क्लास, गृहभेटी च्या नोंदी, व्हाट्सआप ग्रुप ची मोबाईल हातात घेऊन पाहणी केली.आमच्या शाळेतील दैनिक नियोजन,विविध समित्या यांची पाहणी केली.एकंदरीत 2.0 शाळा बंद पण शिक्षण चालू आणि सेतू अभ्यास बाबत समाधान व्यक्त केले.या वर्षीचा निकाल पाहण्यात आला,बाला उपक्रमाबाबत काही सूचना केल्या.आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.आज श्रीमती पांडे एस.बी,श्रीमती गंजेवार व्ही.एल.,श्रीमती रत्नपारखी एस.बी.,श्रीमती पाम्पटवार पी. एस.आणि कैलास पोहरे असे एकूण पाच जण 50% उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .