नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे वार्षीक वेतन वाढ निमित्ताने लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के यांनी भेट दिली असता शासनाने 10 जुलै पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरू राहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत ऑनलाईन पध्दतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
शाळा बंद व लॉकडाउन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त झाली आहेत .खेळण्याच्या वयात मुले ही घरात बंदीस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात ,या बाबींचा विचार करून परिषदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ 1 ली ते 8 वीच्या मुलांसाठी कला कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयावर दर शनिवारी ऑनलाइन पध्दतीने शिकू आनंदे हा उपक्रम सुरू आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे मत मुलांशी सवांद साधताना व्यक्त केले.
त्याअनुषंगाने शाळेतील मुले मैदानावर यातील कृती करत होते. सुरुवातीला वर्ग 5 वी च्या मुलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्याकडून मागील शनिवारचे व आजच्या दिनाचे वेगवेगळ्या मुलांकडून प्रात्यक्षिक मुलांकडून करवून घेतले , सेतू अभ्यासक्रम लिहिलेल्या वह्या तपासल्या. अभ्यासमाला 2.0 चे मुलांनी केलेले उपक्रम अंतर्गत साहित्य पाहून आनंद व्यक्त केला. पुण्याहून आलेल्या महेश या विद्यार्थ्यांशी सवांद साधून शाळेबाबत चर्चा केली ,मुलींनी साहेबांचे तुळशीचे रोपटे व मुलांनी कागदी फूल देऊन स्वागत केले.
वर्ग 5 वीचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे सर यांनी विद्यार्थीनिहाय दैनिक नोंदी, सेतू अभ्यास टाचण , दैनिक अभ्यासमाला यांच्या नोंदी , शिकू आनंदे अंतर्गत त्यांनी सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती ,विद्यार्थ्यांची वैयक्तिक, तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची माहिती यात टिव्ही असणारे ,कोरोनाची लस घेणारे कुटूंब ,पालकांचा व्यवसाय आदी बाबींची संपूर्ण माहिती पाहून सहशिक्षक रवी ढगे यांचे अभिनंदन केले.
मुलांचे कौतुक करून साहेबांच्या वतीने शैक्षणिक साहित्य म्हणून पेन्सिल भेट म्हणून देण्यात आल्या. यानंतर गट शिक्षणाधिका-यांनी वर्ग 1 ली , 3 री च्या मुलांशी सवांद साधला , वर्ग 6 वीच्या मुलांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापन केले व त्या मुलांना वह्याचे वाटप केले. यावेळी केंद्रप्रमुख टी पी पाटील, सुगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जी एस मंगनाळे , शाळेचे मुख्याध्यापक आनंद दरेंगावे , उपक्रमशील शिक्षक रवी ढगे, विषय शिक्षक डी डी होळकर, श्रीमती माधुरी मलदोडे, श्रीमती जयश्री बारोळे आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .