नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :
शासन परिपत्रकानुसार तंबाखू मुक्त शाळा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निकष घोषित केलेले आहेत सदर निकषांची पूर्तता करून आपणास नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करावयाच्या आहेत. त्या अनुषंगाने ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तंबाखू मुक्त शाळा करण्यासंदर्भात सलाम मुंबई फाऊंडेशन राज्यभर गत अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील 34 हजार पेक्षा अधिक शाळा तंबाखू मुक्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील शाळा तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा अधिकारी डॉ विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील अनेक व्यवस्थापनाच्या शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. हा उपक्रम जिल्हा परिषद नांदेड व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असून यास आजून गती मिळावी म्हणून जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या झूम ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केले असून यामध्ये तंबाखूमुक्त शाळेचे निकष पूर्ण करणे बाबत मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार आहेत. या संदर्भातील जिल्ह्यातील झूम बैठकीचे आयोजन दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेसमाध्यमिक शिक्षण अधिकारी माधव सलगर ,उपशिक्षण अधिकारी दत्तात्रय मठपती, दिलीप कुमार बनसोडे, बंडू आमदूरकर हे सुद्धा राहणार आहेत. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तालुक्यातून पाच तज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांनी लिंक द्वारे सभेस पूर्णवेळ उपस्थित राहावयाचे आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, सलाम मुंबई फाऊंडेशनचे सचिन वानखेडे, नांदेड जिल्हा समन्वयक रवि ढगे, नागेश क्यातमवार, रमेश मुनेश्वर यांनी कार्यशाळेस ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .