नांदेड (शालेय वृत्तसेवा):
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर- घुगे , जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाराणी अंबुलगेकर ,शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. विजय धोंडगे,उप शिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर , डी.एस. मठपती, दिलीप बनसोडे जिल्हा परिषद नांदेड यांना शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी संघटनात्मक निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यांत केंद्रप्रमुख पदभार देताना शासन नियमानुसारच देण्यात यावे. एका तालुक्यात किमान एकच निकष ठेवण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावे.जिल्हा परिषदेच्या शेषनिधीतुन सर्वच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे.12 वर्ष 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना तात्काळ प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे.भविष्य निर्वाह निधी स्लिप 2020-21 ची तात्काळ देण्यात यावी.जिल्ह्यातील विषय शिक्षकांना पदविधर शिक्षकांची वेतन श्रेणी तात्काळ लागु करावी .गेल्या 20 वर्षापासून प्रलंबीत असलेली निवड श्रेणी शिक्षकांना देण्यात यावी.शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार दि. 14 जुन 2021 शिक्षकांना सि. एम. पी. प्रणाली व्दारे वेतन दर माहा 1 तारखेला राष्ट्रीयकृत बँकेमार्फत होण्यासाठी तात्काळ आदेश सर्व ग.शि.ना. निर्गमित करावे.चट्टोपाध्याय आदेश तात्काळ निर्गमित करावे.
सदरील निवेदनावर राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे ,राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे , जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे ,जिल्हा नेते ग.नु.जाधव,जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे , जिल्हा मुख्य संघटक जे.डी.कदम ,जिल्हा उपाध्यक्ष जी.बी.मोरे , जिल्हा प्रमुख सल्लागार बी .टी . केंद्रे ,लोहा तालुका उपाध्यक्ष व्ही.व्ही. नाईक,अर्धापूर तालुका सरचिटणीस माधव बैनवाड, आदी च्या स्वाक्षरी चे निवेदन देण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .