दोन वर्षापासून रखडलेले राज्य पुरस्कार वितरीत करावे.. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढी देण्यात याव्यात.. शालेयमंत्र्यांना दिले निवेदन !

शालेयवृत्त सेवा
0


दोन वर्षापासून रखडलेले राज्य पुरस्कार वितरीत करावे.. !

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढी देण्यात याव्यात.. !


हिंगोली (शालेय वृत्तसेवा ) :

राज्य शासनाकडून दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले नाहीत. यामुळे राज्य शासनाकडून शिक्षकांना देण्यात येणारा पुरस्कार दोन वर्षापासून थांबला आहे. प्रस्ताव मागणी करून दोन वर्षाचे रखडलेले पुरस्कार लवकर वितरित करावेत असे आशयाचे निवेदन शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.


कोरानामुळे दोन वर्षाचे पुरस्कार थांबलेत , ऑनलाईन नोंदणी सुद्धा करण्यात आली नाही. राज्य शासनाकडून शैक्षणिक कार्य उत्कृष्ट असणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी पाच सप्टेंबर ला  शिक्षक दिनी राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पण अनेक गुणवंत शिक्षक पुरस्कारापासून वंचित आहेत. तरी दोन वर्षाचे राज्य पुरस्कार वितरित करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी निवेदनाव्दारे केले आहे.



या  बरोबरच राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रोख रक्कम ऐवजी दोन वेतनवाढी देण्यात याव्यात.1967 पासून राज्य पुरस्कार्थीना  दोन जादा वेतनवाढ देण्यात येत होत्या परंतु 2014 पासून देण्यात येणाऱ्या जादा वेतन वाढी बंद केल्या त्या ऐवजी रोख रक्कम देण्यात येते राज्यातील या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेळोवेळी शासनाकडे दोन जादा वेतनवाढी  सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पाठपुरावा करत आहे.



राज्यातील जवळपास शंभर विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य यांनी मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देऊन या शिक्षकांना दोन जादा वेतनवाढ देण्याची मागणी केली आहे. विधानसभेच्या अनेक अधिवेशनात या प्रश्नावर तारांकित प्रश्न उपस्थित झाले आहे तरीही या प्रश्नाकडे शासन गंभीरपणे घेत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.  पंधरा ऑगस्ट स्वातंत्रदिनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी भेट घेऊन लेखी निवेदन देऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. 



यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन संघाच्या पदाधिकाऱ्यांना व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिले आहे. त्याचबरोबर  जिल्हा परिषद अंतर्गत उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी , राजपत्रित मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांचे रिक्तपदे  लवकरच भरण्यात यावीत. शिक्षकांना आश्वासित योजना 10:20:30  लागू करण्यात यावी. इतर कर्मचारी यांच्या प्रमाणे शिक्षकांना अर्जित रजा रोखीकरण याचा लाभ देण्यात यावा यासह आदी प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करून सोडण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी माधव वायचाळ , शिवचरण पारटकर ,रमेश गंगावणे , पंडित अवचार, संजय गिरी ,पांडुरंग गिरी , माधवी असेगावकर गजानन पायघन, परसराम हेंबाडे, विनायक भोसले ,रावसाहेब भोसले , रेणुका देशपांडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)