शिक्षकांसाठी: भव्य व्हिडीओ बनविणे स्पर्धा ... तंबाखूमुक्त शाळा अभियान : 'सलाम मुंबई फाउंडेशन' चा उपक्रम !

शालेयवृत्त सेवा
0

 



तंबाखूमुक्त शाळा अभियान : 'सलाम मुंबई फाउंडेशन' चा उपक्रम !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

पाच सप्टेंबर  शिक्षक दिनाचे औचित्य साधून सलाम मुंबई फाउंडेशन द्वारा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी,  भव्य व्हिडीओ बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन  करण्यात आलेले आहे.


स्पर्धेचा तपशील पुढील प्रमांणे.  .

विषय: 

१. शालेय अभ्यासक्रमातील तंबाखू नियंत्रण संदेशाला अनुसरून व्हिडीओ बनवणे.  

२. निश्चय करा - तंबाखू सेवन न करण्याचा (Commit to Quit Tobacco) 


या विषयाला अनुसरून जनजागृती व्हडिओ 

शिक्षकांनी दिलेल्या विषयावर दोन मिनिटांचा व्हिडीओ तयार करून २० ऑगस्ट २०२१ रात्री ११ वाजेपर्यंत दिलेल्या मेल वर पाठवावे.


व्हिडीओ पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता - Respective District Coordinator/ info@salaammumbai.org

व्हिडिओ सोबत पाठविणाऱ्याचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, पद, संपर्क क्रमांक पाठवावा. 


प्रथम येणाऱ्या पाच स्पर्धकांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल तसेच सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी जास्तित जास्त शिक्षकांनी सहभाग घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधव सलगर शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी सचिन वानखेडे, संस्था प्रतिनिधी रवी ढगे,  जिल्हा समन्वयक नागेश क्यातमवार आणि रमेश मुनेश्वर तंबाखु मुक्त शाळा अभियान जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)