जिल्हा परिषद लोणी शाळेतील इयत्ता सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निरोप..

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद लोणी शाळेतील इयत्ता सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, पदवीधर शिक्षक अंकुश राऊत, तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे होते. आठव्या वर्गाची सुरुवात लोणी शाळेत होईल या आशेने विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला नव्हता. 


       यावेळी सातवी उतीर्ण विद्यार्थी कु. मंत्रा सुशिल गुंजकर, कु. श्रेया संतोष गुंजकर, कु.पायल अमोल वाघमारे, कु.लक्ष्मी लक्ष्मण कनाके, कु. प्रतिमा प्रकाश तलांडे आणि अभिषेक प्रल्हाद सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सातवीतील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सुंदर फोटो फ्रेम भेट दिला तर शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांचाच फोटो असलेला कप दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी कु . राधा हनुमंत गुंजकर यांनी केले तर आभार कु. राधा मारोती सावरकर हिने केले. विद्या श्रीमेवार मॅडमच्या सुंदरस्या गीत गायनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)