कोविड लस न घेतलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्टचे वेतन थांबविणे बाबतचे शिक्षणाधिकारीने काढले आदेश !

शालेयवृत्त सेवा
0

 




भंडारा (शालेय वृत्तसेवा ) :

कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरण न केलेल्या शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्टचे वेतन थांबविणे बाबतचे परिपत्रक जिल्हा परिषद भंडाऱ्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ने काढले आहे.


जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली असल्यास त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली नसल्यास त्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट 2021 चे वेतन थांबविण्यात यावे.  तसा अहवाल कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह उलट टपाली या कार्यालयास सादर करावे. याबाबतचे परिपत्रक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी काढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)