महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेसह अन्य शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाना यश !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हयातील वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासुन प्रलंबीत होता.जिल्हयातील वस्तीशाळा शिक्षकाना 1 मार्च 2014 पासुन वेतनश्रेणी लागु करावी.यासाठी म रा शिक्षक परीषदेने वेळोवेळी प्रशासनाकडे लेखी निवेदने दिली होती.त्यासोबतच धरणे आंदोलन,ढोलबजाओ आंदोलनामधे देखील ही मागणी लावुन धरली होती.त्यासोबत अनेक संघटनांचीही ही मागणी होती.मा.मुख्यकार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकुर मॅडम यानी वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नाला न्याय देवुन जिल्हयातील वस्तीशाळा शिक्षकाना मार्च 2014 पासुन वेतनश्रेणी लागु केली आहे.
शिक्षकांच्या पदोन्नती सोबतच वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर मॅम,शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब,मुकाअ सौ.वर्षा ठाकुर मॅम,शिक्षणाधिकारी मा.प्रशांत दिग्रसकर,उपशिक्षणाधिकारी डी.एस.मठपती, बंडु आमदुरकर, यांचे म रा शिक्षक परीषद नांदेडकडुन मधुकरराव उन्हाळे,सुरेश दंडवते,अशोक बावणे,बालाजी तुमवाड,संजय कोठाळे,डी एम पांडागळे,अशोक पा.पवळे,दिगंबर पा.कुरे,नरसिंग एंड्रलवार,बालाजी पांपटवार,राजेंद्र पाटील,विठ्ठल आचणे,शंकर बेळकोणे,व्यंकट गंदपवाड,संतोष साखरे सह जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकार्यानी अभिनंदन केले.
जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबलगेकर मॅम व शिक्षण सभापती संजय बेळगे साहेब यांच्या सत्कार प्रसंगी शिक्षक संघाचे नेते जिवनराव पाटील वडजे,माजी चेअरमन निळकंठराव चोंडे,परीषदेचे जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,चेअरमन तथा शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पा.पवळे,संघाचे जिल्हाध्यक्ष बंडु पा.भोसले,निवृत गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के, शिविअ प्रल्हाद कदम,सुधीर गोडघासे, परीषदेचे संघटनमंञी शंकरराव बेळकोणे, सल्लागार शंकरराव पडगीलवार,संपर्क प्रमुख व्यंकट गंदपवाड, सहसचिव संगम पडलवार,नायगाव तालुकाध्यक्ष डी.टी.जाधव, उमरी तालुकाध्यक्ष बालाजी पंतोजी,दिगबंर नागलवाड, युवराज राजारूपे, सतिश राठोड,राजकुमार लिंगदळे, इ.उपस्थीत होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .