समाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद तर्फे शेख अब्दुल रहीम पुरस्काराने सन्मानित..

शालेयवृत्त सेवा
0



औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील नामवंत सामाजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक तथा शिक्षक शेख अब्दुल रहीम सर हे शिक्षक दिनानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी ही चार पुरस्काराने सन्मानित झाले. शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनीय व भरीव योगदान दिल्याबद्दल शेख अब्दूल रहीम सर यांना शिक्षक दिनानिमित्त चौफेर(चार) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद तर्फ आदर्श शिक्षक पुरस्कार, शालेयवृत्त तर्फे सन्मानपत्र आणि शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धा सन्मान पत्र तसेच शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद तर्फे औरंगाबाद येथे एका भव्यदिव्य कार्यक्रम हॉटेल कीज् मध्ये शिक्षण विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक मा. अनिल जी साबळे साहेबांचे शुभहस्ते तसेच प्रसिद्ध उद्योगपती तसेच लायन्स क्लब चे संस्थापक अध्यक्ष व व्यावसायिक राधावल्लभजी धुत, पीडीजी व मार्गदर्शक ला.तनसुख झांबड, रीजन चेअरपरसन राजेश भारूका, लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद च्या अध्यक्षा ला.निर्मला झांबड यांच्या उपस्थितीत हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांना सन्मानपत्र, श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ आणि रोख बक्षीस (पाकीट) देऊन गौरविण्यात आले. 


शेख अब्दुल रहीम सर यांना आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यात ते विद्यार्थी-शिक्षकांच्या प्रश्नासाठी सदैव लढा देत असतात व महाराष्ट्र शासनापर्यंत त्यांच्या समस्या पोहचवितात. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या द्वारे वर्षभर  विद्यार्थी-शिक्षकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. 


शिक्षक दिनानिमित्त शेख अब्दुल रहीम सर यांना चौफेर(चार) पुरस्कार मिळाल्या बद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.अब्दुल सत्तार, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल, शिक्षक भारती चे प्रकाश दाणे, संतोष ताठे, शगुफ्ता फारुकी,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रा.संजय जाधव, मूप्टा चे प्रा.सुनील मगरे,शिक्षक समिती चे दिलीप ढाकणे, ग्राहक सरंक्षण समिती चे वाजीद असलम, सल्लागार डॉ. फुरकान दिवाण, सय्यद अब्दुल हमीद, डॉ. सलीम भोकरदन तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी तसेच त्यांच्या चाहते आणि आई वडील मित्र परिवारातर्फे अभिनंदन व कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)