सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
मालेगाव येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी राज्य तसेच जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना किनो शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाचे किनो शिक्षा गौरव पुरस्कारजाहीर झाले असून जिल्हास्तरीय पुरस्कार सांगली जिल्ह्यातील जि. प. शाळा दहिवडी ता. तासगाव येथील प्राथमिक शिक्षक श्री अजय काळे यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे सचिव रईस शेख यांनी दिली .
या राज्यस्तरीय पुरस्कारासह नाशिक जिल्ह्यातील २४ तर अहमदनगर, अमरावती,धुळे,ठाणे,पुणे,पालघर, परभणी, नांदेड,लातूर, मुंबई, रायगड,नंदुरबार, औरंगाबाद,यवतमाळ, सांगली या जिल्ह्यातील प्रत्येकी एक अश्या १९ शिक्षकांना जिल्ह्यास्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते .सुमारे ३६० शिक्षकांनी आपले प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने पाठवले.याचे संस्थेच्या समितीद्वारे परीक्षण करण्यात येऊन पुरस्कार जाहीर करीत आहोत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .