भावी पिढी घडविणे शिक्षकांच्या हातात - निर्मलकुमार सुर्यवंशी

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आजच्या काळात शिक्षण हे कोरोनाच्या अक्राळविक्राळ जबड्यात अडकले असून मुलांचे भावी शैक्षणिक आयुष्य संकटात सापडले आहे. देशाच्या भावी पिढी घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षकांच्याच हातात आहे असे मत येथील निर्मल प्रकाशनचे प्रकाशक तथा कृष्णाई वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष निर्मलकुमार सुर्यवंशी यांनी मांडले. ते प्रकाशन संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून साहित्यिक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मिलिंद ढवळे, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रणजीत गोणारकर, प्रकाश ढवळे, श्रीकांत मगर, साईनाथ रहाटकर आदींची उपस्थिती होती.



            भारताचे माजी राष्ट्रपती तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन संबंध भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून निर्मलकुमार सुर्यवंशी यांनी मिलिंद ढवळे ( ललित लेखक), गंगाधर ढवळे ( समीक्षक), नागोराव डोंगरे (कवी), रणजीत गोणारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना सूर्यवंशी म्हणाले की, आज आॅनलाईन पद्धतीने शिक्षण ही काळाची गरजच बनली आहे. परंतु शहरासह ग्रामीण भागात ही प्रणाली म्हणावी तशी यशस्वी झालेली नाही. त्यामुळे शिक्षक साहित्यिकांनी साहित्याबरोबरच शिक्षण प्रक्रियेची सैद्धांतिक तथा व्यवहार्य मांडणी करावी, असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)